File Photo 
महाराष्ट्र

चर्चा तर होणारच ; ड्युटीवर असताना रील्स बनवून इन्स्टाग्रामवर अपलोड करणे पडले महागात

निलंबित महिला कंडक्टरचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. गिरी वेगवेगळ्या गाण्यांचे व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल

प्रतिनिधी

ड्युटीवर असताना रील्स बनवून इन्स्टाग्रामवर अपलोड करणे उस्मानाबाद जिल्ह्यातील एका महिला कंडक्टरला महागात पडले आहे. एसटी महामंडळाने संबंधित महिला कंडक्टरला निलंबित केले आहे. मंगल सागर गिरी असे निलंबित महिला कंडक्टरचे नाव आहे. गिरी या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब एसटी आगर येथे कार्यरत आहेत. एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी मंगल गिरी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. याच कारणावरून महापालिकेने वाहतूक नियंत्रकाला निलंबितही केले आहे. कल्याण कुंभार असे वाहतूक नियंत्रकाचे नाव आहे.

निलंबित महिला कंडक्टरचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. गिरी वेगवेगळ्या गाण्यांचे व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल करतात. त्याच्या विविध व्हिडिओंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मात्र, गिरी यांनी एसटी महामंडळाचा ड्रेस परिधान करून तुळजाभवानी देवीच्या गाण्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्वत:चे व्हिडिओ बनवून एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यामुळे एसटी महामंडळाकडून निलंबित करण्यात आले आहे.

Mumbai : मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक

Navi Mumbai : खारघर हाफ मॅरेथॉनमुळे उद्या वाहतुकीत बदल; पहाटे ५ वाजल्यापासून 'या' मार्गांवर निर्बंध, वाहतूक पोलिसांकडून सूचना

मुंबईत ATS ची मोठी कारवाई! माहीममधून तरुणाला अटक; जैश-ए-मोहम्मदशी संबंध असल्याचा संशय

Philippines Plane Crash : प्रशिक्षणादरम्यान हवाई दलाच्या दोन विमानांची धडक; चार वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू, Video

Video : हॉस्टेलमध्ये 'अँटी-सुसाइड' पंखे; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सुरतमधील विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय