महाराष्ट्र

बीज सोहळ्याच्या निमित्ताने विश्वविक्रमी पगडीची निर्मिती; वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया ॲॅन्ड जिनिअस बुकमध्ये पगडीची नोंद होणार

संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याच्या निमित्ताने विश्वविक्रमी पगडी तयार करण्यात आली आहे. तुकाराम महाराजांची ही पगडी जाज्वंल इतिहास आणि विश्ववंदनीय साहित्याचे प्रतिक आहे.

Swapnil S

पुणे : संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याच्या निमित्ताने विश्वविक्रमी पगडी तयार करण्यात आली आहे. तुकाराम महाराजांची ही पगडी जाज्वंल इतिहास आणि विश्ववंदनीय साहित्याचे प्रतिक आहे. या पगडीमुळे सर्वांना संत तुकाराम महाराजांकडून प्रेरणा आणि उर्जा मिळणार आहे. याचे लोकार्पण पार पडले असून या भव्य आकार पाहून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

जगातील सर्वात मोठ्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पगडीचा लोकार्पण सोहळा पार पडला. या पगडीची नोंद वर्ल्ड रेकॉर्डस् इंडिया ॲन्ड जिनिअस बुकमध्ये नोंद होणार आहे. संत तुकाराम महाराजांच्या या पगडीचा घेराव हा २२ फुटांचा असून पगडीची उंची ४ फूट आहे. ही विश्वविक्रमी पगडी तयार करण्यासाठी ४५० मीटर लांबीचा कपडा लागला आहे. या पगडीची वारकरी सांप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाची आणि गौरवाची बाब मानली जात आहे.

पगडी सुती कापडापासून बनविण्यात आली आहे. या भल्या मोठ्या पगडीचे अनावरण दिलीप सोनीगरा यांच्या माध्यमातून करण्यात आले असून, ही विश्वविक्रमी पगडी सुती कापडापासून बनविण्यात आलेली आहे.

सदर पगडी शैलेश यादव यांनी तयार केली तर पवन सोळंकी हे प्रेसिडेंट अन् सीईओवर्ल्ड रेकॉर्डस् इंडिया अॅन्ड जिनिअस बुक फाऊंडेशन यांनी सांगितले की, सदर पगडी शैलेश यादव यांनी तयार केली असून, दिलीप सोनीगरा यांच्या संकल्पनेतून ती आकाराला आली आहे. ही पगडी उंचीने पाच फूट असून, रुंदीने दहा फूट आहे आणि या पगडीचा घेर हा ३० फुटांचा आहे. त्यामुळे ही पगडी लोकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरली असून, आज देहूगाव येथील संत तुकाराम महाराज यांच्या मंदिरामध्ये पगडी ठेवण्यात आली आहे.

नवा विश्वविक्रम

या पगडीचा घेर ३० फुटांचा असून, याची उंची चार फुटांपर्यंत आहे. या पगडीला तयार करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी लागला असून, ही पगडी पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात आलेली आहे. या अगोदर २८ फुटांच्या पगडीची विश्वविक्रमी नोंद झाली होती. परंतु यंदा ३० फूट घेर असलेली पगडी तयार करून हा विश्वविक्रम करण्यात आलेला आहे, असे प्रतिपादन पगडी बनवणारे शैलेश यादवांनी केले आहे.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या