महाराष्ट्र

काल कुख्यात गुंडांची, तर आज अमली पदार्थ तस्कारांची परेड; पुणे पोलीस आयुक्तांचा पुन्हा दणका

आज गुन्हे शाखा, सामाजिक सुरक्षा विभागाकडून अवैध मटका, जुगार, क्लब, लॉटरी, पत्त्यांचा क्लब चालविणाऱ्या सर्व गुन्हेगारांना पोलीस मुख्यालयात बोलविण्यात आले. यावेळी त्यांची परेड घेण्यात आली. यावेळी अवैध धंदे करणाऱ्यांना अवैध काम करताना...

Rakesh Mali

पुण्यात सध्या नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नावाची चर्चा आहे. काल(६ फेब्रुवारी) पुण्यातील कुख्यात गुंडांची पोलीस मुख्यालय परिसरात ओळख परेड काढण्यात आली. त्यानंतर आज(७ फेब्रुवारी) गुन्हे शाखा, सामाजिक सुरक्षा विभागाकडून अवैध धंदे आणि अमली पदार्थ तस्कारांचीही परेड काढण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्स तस्करीची प्रकरणे समोर आपल्याने त्यास आळा घालण्यासाठी हे पाऊल उचण्यात आले आहे.

आज गुन्हे शाखा, सामाजिक सुरक्षा विभागाकडून अवैध मटका, जुगार, क्लब, लॉटरी, पत्त्यांचा क्लब चालविणाऱ्या सर्व गुन्हेगारांना पोलीस मुख्यालयात बोलविण्यात आले. यावेळी त्यांची परेड घेण्यात आली. यावेळी अवैध धंदे करणाऱ्यांना अवैध काम करताना आढळून आल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला.

नावावर सातत्याने वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद असलेले स्थानिक पातळीवरचे गुन्हेगार, कालच्याप्रमाणे टोळी प्रमुख यामध्ये नसले तरी दोनशेच्या आसपास स्थानिक गुन्हेगार पोलिसांकडून आज परेडसाठी बोलावण्यात आले. त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीचा फॉर्म भरून घेतला जाईल. यामध्ये शस्त्रे, अमली पदार्थ आणि स्थानिक पातळीवरील गुन्ह्यात आरोपी असलेल्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. ३२ पोलीस ठाण्यात रेकॉर्ड असलेल्या गुन्हेगारांना बोलावण्यात आले.

दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशी पुणे पोलीस मुख्यालयात गुन्हेगारांना तंबी देण्यात आल्याने सर्वत्र पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे. काल पुणे पोलीस मुख्यालयातील मोकळ्या जागेवर गुंडांना एका रांगेत उभे करण्यात आले होते. गेल्या काही दिवासांपासून भाईगिरी करणारे आपला व्हिडिओ मोबाईलवर रिल्स करून सोशल मीडियावर टाकत आहेत. त्यावरून पोलिसांनी पुण्यातील गुंडांना तंबी दिली.

नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील रहेजा रेसिडेन्सीला भीषण आग; ६ वर्षांच्या चिमूरडीसह ४ जणांचा मृत्यू, १० जखमी

मुंबईकरांनो सावधान! हवेची गुणवत्ता ढासळली, प्रदूषणात होतेय वाढ, AQI १६४ वर पोहोचला

समुद्रकिनारे धोक्यात! CRZ ‘बफर झोन’ ५०० वरून २०० मीटर करण्याचा नीती आयोगाचा प्रस्ताव, पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली नाराजी

अंदमान-निकोबार बेटांवर चक्रीवादळ धडकणार; हवामान खात्याचा इशारा

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दिल्लीतील हवा ‘अतिशय खराब’; दिल्लीकरांनी घेतला विषारी श्वास, हवेचा एक्यूआय ३०० च्या पुढे