मुंबई अपघात प्रातिनिधिक फोटो
महाराष्ट्र

धक्कादायक! मुंबईत पुणे अपघाताची पुनरावृत्ती...अल्पवयीन मुलानं दुचाकीनं तरुणाला उडवलं, वडिलांना अटक

या अपघात प्रकरणी जेजे मार्ग पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन डोंगरी बालगृहात पाठवले असून त्याच्या वडिलांना...

Suraj Sakunde

मुंबई: पुण्यात एका अल्पवयीन मुलानं अलिशान पोर्श गाडी चालवत दिलेल्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण ताजं असतानाच आता मुंबईतही अशाच प्रकारची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील माझगाव परिसरात एका अल्पवयीन मुलानं दुचाकी चालवताना दिलेल्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दुचाकी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी बालसुधारगृहात पाठवलं असून त्याच्या वडिलांना अटक केली आहे.

अल्पवयीन मुलाची बालगृहात रवानगी तर वडिलांना अटक-

मुंबईतील माझगाव परिसरात अल्पवयीन मुलाच्या दुचाकीच्या धडकेत एका ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत इरफान नवाब अली शेख नावाचा व्यक्ती गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जेजे रुग्णालयात नेण्यात आले होतं, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी जेजे मार्ग पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन डोंगरी बालगृहात पाठवले असून त्याच्या वडिलांना अटक केली आहे. जेजे मार्ग पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३०४(२) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम ३,४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईत पुण्याची पुनरावृत्ती-

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात रविवारी पहाटे बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलानं दारू पिऊन बेदरकारपणे अलिशान पोर्श गाडी चालवत एका दुचाकीला धडक दिली होती. या अपघातामध्ये दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण ताजं असतानाच आता मुंबईतही अशीच घटना घडली आहे. मुंबईतील माझगाव परिसरात अल्पवयीन मुलाच्या दुचाकीच्या धडकेत एका ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.

पुणे अपघातप्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना पोलीस कोठडी, मुलाचा जामीनही रद्द-

पुण्यातील कल्याणीनगर भागात शनिवारी मध्यरात्री झालेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्यासह सात जणांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान विशाल अग्रवाल यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर कोर्टानं त्यांना २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी