मुंबई

‘बेलासिस’च्या पोहोच रस्त्यासाठी १०० कोटी! निविदा मंजुरीच्या प्रक्रियेत; मुंबई सेंट्रल-ग्रँट रोड स्थानकादरम्यान प्रवाशांची सोय 

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक आणि ग्रॅंट रोड रेल्वे स्थानक यांच्यामधील बेलासिस पुलाचा सध्याचा पोहोच रस्ता निष्कासित करून त्याचे पुनर्बांधकाम करण्यासाठी एकूण ९९ कोटी ७८ लाख ३० हजार रुपये सविस्तर अंदाजित खर्चाच्या योजनेस मंजुरी देण्याची प्रक्रिया मुंबई महापालिकेने सुरू केली आहे.

Swapnil S

शिरीष पवार/मुंबई

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक आणि ग्रॅंट रोड रेल्वे स्थानक यांच्यामधील बेलासिस पुलाचा सध्याचा पोहोच रस्ता निष्कासित करून त्याचे पुनर्बांधकाम करण्यासाठी एकूण ९९ कोटी ७८ लाख ३० हजार रुपये सविस्तर अंदाजित खर्चाच्या योजनेस मंजुरी देण्याची प्रक्रिया मुंबई महापालिकेने सुरू केली आहे. 

विशेष म्हणजे या कामासाठी महापालिकेला कार्यालयीन अंदाजापेक्षा उणे १२.६२ टक्के इतक्या लघुत्तम दराची निविदा प्राप्त झाल्याने मंजुरीसाठी तिची शिफारस करण्यात आली आहे. शिवाय या कामासाठी तांत्रिक सल्लागाराला एक कोटी सात लाख ९६ हजार रुपये दिले जाणार आहेत. महापालिकेच्या पूल खात्याच्या प्रमुख अभियंत्यांनी या कामाचा प्रस्ताव तयार केला होता. तो आता महापालिकेच्या स्थायी तसेच सुधार समितीच्या म्हणजेच विद्यमान प्रशासकांच्या मंजुरीच्या प्रक्रियेत आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरील पुलांचे आयुर्मान लक्षात घेता पालिकेशी संबंधित पुलांच्या पुनर्बांधणीचे काम महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन (एमआरआयडीसीए) कडे सोपविण्यात आले होते. मध्यंतरी पश्चिम रेल्वे प्राधिकरणाने तातडीची बाब म्हणून ग्रॅंट रोड आणि चर्नी रोड रेल्वे स्थानकांदरम्यानच्या फेरेरे पुलाचे रिगर्डरिंग म्हणजेच तुळयांची पुनर्स्थापना तसेच पोहोच रस्त्ताच्या मजबुतीकरणाचे काम हाती घेतले. त्यानंतर नोव्हेंबर २०२१ मध्ये हा पूल वाहतुकीस खुला करण्यात आला. रेल्वे पुलांच्या रिगर्डरिंगची प्राथमिक तपासणी आणि व्यवहार्यता अहवाल देण्यासाठी पालिकेने व्हीजेटीआय या संस्थेची नियुक्ती केली होती. बेलासिस पुलाच्या रिगर्डरिंगचे काम फेरेरे पुलाच्या धर्तीवर करता येईल, असा अहवाल या संस्थेने दिला होता. त्यानुसार हे काम करण्यासाठी एमआरआयडीसीएल कंपनीला कळविण्यात आले. या कंपनीने त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर बेलासिस पुलाच्या पुनर्बांधणीचे काम करण्याची तयारी पश्चिम रेल्वेने दाखविली. त्याला संबंधित प्राधिकरणांनी मंजुरीही दिली होती. 

पश्चिम रेल्वे प्रशासनाने बेलासिस पुलाच्या पोहोच रस्त्याच्या मजबुतीकरणाची व्यवहार्यता तपासली असता या कामासाठी बाजूला जागा उपलब्ध नसल्याचे दिसून आले.

महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती; बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव

Gen-Z पुढे अखेर नेपाळ सरकार कोसळलं; 'या' दोन मिलेनियल नेत्यांनी नेपाळचे पालटले चित्र

नेपाळमध्ये परिस्थिती चिघळली! PM पाठोपाठ राष्ट्रपतींचाही राजीनामा; आंदोलकांनी परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्र्यांसह माजी PM ना पळवून पळवून मारले

GenZ Protests : नेपाळमध्ये वातावरण तापले; पंतप्रधान ओलींचा राजीनामा, आंदोलकांसमोर अखेर माघार

करिश्मा कपूरच्या मुलांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; वडिलांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये वाट्याची मागणी