मुंबई

अकरावी ऑनलाईन प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; ५ जूनपर्यंत करता येणार नोंदणी

इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५ - २६ अंतर्गत विद्यार्थी नोंदणीसाठी ५ जूनपर्यंत दुपारी २ वाजेपर्यंत वाढ करण्यात आल्याचे शालेय शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

Swapnil S

मुंबई : इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५ - २६ अंतर्गत विद्यार्थी नोंदणीसाठी ५ जूनपर्यंत दुपारी २ वाजेपर्यंत वाढ करण्यात आल्याचे शालेय शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अंतर्गत नोंदणीसाठी २६ मे ते ३ जून २०२५ हा कालावधी देण्यात आला होता. ६ मे रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीबाबत काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये महाविद्यालयातील इन-हाऊस कोट्यातील जागा भरण्यासाठी आवश्यक बदलाबाबत शासनाने ३१ मे रोजीच्या पत्रान्वये आदेश दिले असल्याने आता या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीसाठी ५ जून रोजी दुपारी २ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे प्र. शिक्षण संचालक (माध्यमिक) डॉ. श्रीराम पानझाडे यांनी सांगितले.

या पत्रानुसार इन-हाऊस कोट्याअंतर्गत खासगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना १० टक्के जागा आरक्षित असतील. मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे या क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय/ वरिष्ठ महाविद्यालय संलग्नित संस्थांच्या शाळांकरीता एक युनिट ग्राह्य धरण्यात येत आहे. राज्यातील उर्वरित जिल्ह्यांसाठी त्याच संस्थेची शाळा व उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय/ वरिष्ठ महाविद्यालय यासाठी महसूली जिल्ह्यांमध्ये एक यूनिट इन-हाऊस कोट्यासाठी ग्राह्य धरण्यात येत आहे.

इयत्ता ११ वी प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थी/ पालक यांनी विद्यार्थी नोंदणी https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यापुढील वेळापत्रक यापूर्वी प्रकाशित केल्याप्रमाणे राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video