मुंबई

मुंबईतील मालमत्ता विक्रीत १२ टक्के वाढ; ठाणे, डोंबिवली, वसई, पनवेल, कल्याणमध्ये सर्वाधिक व्यवहार

राष्ट्रीय विक्रीच्या आकडेवारीत ३५ टक्क्यांचा सर्वाधिक वाटा घेतला गेला आहे

वृत्तसंस्था

मुंबईतील मालमत्तांचा नवीन पुरवठा आणि विक्री यांच्यामध्ये एप्रिल आणि जून २०२२ मध्ये ४२ टक्के आणि १२ टक्के वाढ झाल्याचे ऑनलाइन रिअल इस्टेट कंपनी प्रॉपटायगर डॉटकॉमने आरईएच्या सहयोगाने केलेल्या अहवालात दिसून आले. ग्राहकांच्या भावना शहरातील निवासी मालमत्तांबाबत सकारात्मक आहेत.

मुंबई शहरात एप्रिल-जून २०२२ च्या तिमाहीत विकल्या गेलेल्या २६१५० एककांसोबत राष्ट्रीय विक्रीच्या आकडेवारीत ३५ टक्क्यांचा सर्वाधिक वाटा घेतला गेला आहे. विक्रीचे मोठ्या प्रमाणावरील व्यवहार ठाणे पश्चिम, डोंबिवली, वसई, पनवेल आणि कल्याण परिसरांमध्ये झाल्याचे अहवालात दिसले.

हाऊसिंग डॉटकॉम आणि नारडेको या उद्योगातील संस्थेने केलेल्या संयुक्त अहवालात भाग घेतलेल्या मुंबईतील ४२ टक्के संभाव्य घर खरेदीदारांनी रिअल इस्टेटला त्यांचा प्राधान्याचा मालमत्ता वर्ग म्हणून गुण दिले. या सर्वेक्षणातून असेही दिसून आले की, अनेक ग्राहकांना मालमत्तेच्या किमती वाढणे अपेक्षित आहे आणि त्यांच्या घरखरेदीच्या योजना अंतिम करण्यासाठी लवचिक पेमेंट योजना आणि सवलतीच्या ऑफर्सची गरज असते.

रुपये १-३ कोटी रुपयांच्या परिघात असलेल्या मालमत्तांना कमाल (२८ टक्के) मागणी असल्याचे मुंबईत दिसून आले. या वर्गातील सर्वाधिक विक्री ठाणे पश्चिममध्ये झाली. घरखरेदीदारांमध्ये १ बीएचकेला सर्वाधिक प्राधान्य राहिले. त्यांनी मुंबईतील एकूण विक्रीमध्ये ५३ टक्क्यांचा सर्वाधिक वाटा उचलला” असे मत हाऊसिंग डॉटकॉम, प्रोपटायगर डॉटकॉम आणि मकान डॉटकॉमचे समूह मुख्य वित्तीय अधिकारी विकास वाधवान यांनी व्यक्त केले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक