मुंबई

5 जी लाँचिंग आणि सणासुदीमुळे नोकरभरतीत १३ टक्के वाढ

प्रतिनिधी

देशात ५जी सेवा लाँच होणे आणि सणासुदीमुळे कंपन्या कर्मचाऱ्यांची वेगाने भरती करत असल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबरमध्ये खासकरून टेलिकॉम सेक्टरच्या भरतीत वार्षिक अाधारावर १३ टक्के वाढ वाढली. मोठ्या टेलिकॉम कंपन्या विविध शहरांत ५जी सेवा सुरू करणार आहेत. या कंपन्या आपल्या डेटा सेंटर्सची क्षमता वाढण्याबरोबरच तज्ज्ञ पदावर भरती करत आहेत. शिवाय सणांच्या मागणीमुळे टिअर-२ शहरात हंगामी नोकऱ्याही वाढल्या आहेत. परिधान, वस्त्रोद्योग आणि ज्वेलरी क्षेत्रातील भरतीमध्ये ११ टक्के वाढ झाली. त्याच वेळी, उत्पादन आणि रिटेल क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये ५-५ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. मॉन्स्टर एम्प्लॉयमेंट इंडेक्सच्या सप्टेंबरच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली. अहवालानुसार, कोरोनानंतर कंपन्याच्या विस्तार योजनांमुळे या वर्षी सणासुदीच्या काळात मागील वर्षांच्या तुलनेत भरती चांगली झाली. ग्राहक खरेदीदारीमुळे उत्साहित आहेत. त्यामुळेच इम्पोर्ट/एक्स्पोर्ट क्षेत्रात हायरिंग सर्वात २८ टक्के वाढली. कंपन्या डिजिटलायझेशनवर मोठी गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे ऑटोमेशन/ऑफिस इक्विपमेंट होस्टिंगमध्ये व्यावसायिकांची मागणी ६५ टक्के वाढली. अशा प्रकारे बीएफएसआय क्षेत्रात खासकरून मेट्रो शहरांत भरतीत २० टक्के वाढीसह सलग वाढीचा कल दिसून येत आहे. हॉस्पिटॅलिटी आणि ट्रॅव्हल क्षेत्रातील भरतीमध्ये ८ टक्के वाढ झाली.

टिअर-२ आणि ३ शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती हाेत आहे. कोरोनानंतर नोकरभरतीत वाढ झाली आहे. यापुढेही भरती आणखी सुरू राहील अशी अपेक्षा आहे.

रिटेल, ई-कॉमर्स, ट्रॅव्हल, मॅन्युफॅक्चरिंग, आयात-निर्यात क्षेत्रांच्या विक्रीला सणासुदीचा हंगाम हातभार लावतो. टिअर-२ आणि टिअर-३ शहरेही नोकऱ्यांमध्ये भर टाकतील, असे शेखर गरिसा, सीईओ, मॉन्स्टर डॉट कॉम म्हणाले.

नाशिक शिंदेंकडेच! हेमंत गोडसे यांना मिळाली उमेदवारी

अखेर ठरले! महायुतीने ठाण्यातून शिंदे गटाचे शिलेदार नरेश म्हस्के, कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना दिली उमेदवारी

पंतप्रधान मोदींनी पवारांवर केलेल्या 'त्या' टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर; "वखवखलेला आत्मा..."

LPG Price Cut : व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात; आजपासून लागू होणार नवे दर

आज मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेची लाट; मराठवाडा, विदर्भात पावसाचा इशारा