मुंबई

पालिका शाळांतील १४ टक्के विद्यार्थी दृष्टीदोषाचे शिकार; आरोग्य विभागाची धक्कादायक माहिती

गिरीश चित्रे

गिरीश चित्रे / मुंबई

विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासह विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते, असा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येतो. मात्र पालिकेच्याच आरोग्य विभागाने पालिका शाळांतील २ लाख ५४ हजार ४९८ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली असता १४ टक्के विद्यार्थी दृष्टीदोषचे शिकार ठरले आहेत. तसेच, ३ टक्के विद्यार्थ्यांना जन्मजात हृदयरोगाने ग्रासले आहे, तर ८ टक्के विद्यार्थ्यांना हाडाचा आजार असल्याची धक्कादायक माहिती आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.

मुंबई महापालिकेच्या शाळेत साडेचार लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. पालिका शाळांमध्ये येणारे विद्यार्थी गरीब कुटुंबातील आहेत. त्यामुळे पालिका शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासह वह्या, पुस्तके, गणवेश, बूट, वॉटर बॉटल, दफ्तर आदी २७ शालेय वस्तू मोफत देण्यात येतात. तसेच विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत या जा करण्यासाठी मोफत बस सेवा उपलब्ध करण्यात येते. एकूणच पालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासह विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर भर दिला जातो. मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याची धक्कादायक माहिती आरोग्य विभागाने उपलब्ध केलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.

आरोग्य विभागाद्वारे दर वर्षी इ.१ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांची शाळेत जाऊन वैद्यकीय चमू द्वारे आरोग्य तपासणी करण्‍यात येते. शैक्षणिक वर्ष सन २०२३ - २४ या कालावधीत तब्बल २ लाख ५४ हजार ४९८ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात १ लाख २८ हजार ४२९ मुलं तर १ लाख २६ हजार ०६९ मुलींची तपासणी करण्यात आली. या तपासणीत १४ टक्के विद्यार्थ्यांना दृष्टीदोष, ३ टक्के विद्यार्थ्यांना दमा व जन्मजात हृदयरोग, १२ टक्के विद्यार्थ्यांना खरुज बुरशीजन्य संसर्ग तर ८ टक्के विद्यार्थ्यांना हाडाचा आजार असल्याचे निदान झाल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.

अशी झाली तपासणी

  • विद्यार्थी मुलं १,२८,४३९

  • विद्यार्थी मुली १,२६,०६९

  • एकूण २,५४,४९८

विद्यार्थ्यांमध्ये या आजारांचे निदान दृष्टीदोष, त्वचा रोग, जन्मजात हृदयरोग, हाडांचे आजार

...तर मोफत उपचार

या आरोग्य तपासणीत निदान झालेल्या सर्व मुले व मुली यांना महानगरपालिका अंतर्गत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाते. प्रत्येक आजारी विद्यार्थी ठणठणीत बरा होऊन घरी जाईपर्यंत संपूर्ण मोफत उपचार करण्यात येतात, असे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन