मुंबई

पालिका शाळेत शिपाईची १,७९७ पदे रिक्त

माहिती अधिकारातून उघड

प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील शाळांअंतर्गत शिपाई, हमाल आणि माळी व रखवलदार यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस शिक्षणाधिकारी कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या माहिती अधिकारात उघडकीस आली आहे. पालिका शाळेत शिपाईची एकूण १७९७ पदे रिक्त आहेत. तर ३९१ हमाल आणि १२२ माळी व रखवलदारांची पदे रिक्त आहेत.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे मुंबई महानगरपालिकेतील शाळाअंतर्गत रिक्त पदांची माहिती मागितली होती. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी यांनी अनिल गलगली यांस मुंबई महानगरपालिकेतील शाळा अंतर्गत शिपाई, हमाल आणि माळी-रखवलदार या पदांची आकडेवारी उपलब्ध करून दिली. यात शिपाईची एकूण मंजूर पदे २,६३५ असून रिक्त पदांची संख्या १७९७ आहे. हमाल ही पदे ६०२ असून सध्या ३९१ पदे रिक्त आहेत तर माळी अन् रखवलदारांची १२२ पदे रिक्त असून मंजूर पदांची संख्या २३१ आहे.

रिक्त पदे तात्काळ भरा!

गलगली यांच्या मते, प्रत्येक शाळेत शिपाई ही पदे महत्त्वाची असून सद्यस्थितीला मोठ्या प्रमाणावर ही पदे भरली गेली नाही. यामुळे शाळा स्तरावर दैनंदिन कामकाज करण्यासाठी अडचणी येतात. यावर्षी शिक्षण विभागाने निधी वाढवला असून रिक्त पदे तत्काळ भरणे आवश्यक आहे. महत्वाची रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी, अशी मागणी अनिल गलगली यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

मुख्यमंत्रीपदाचा फैसला आज; महायुतीचे नेते व केंद्रीय संसदीय मंडळ घेणार निर्णय

महायुतीत मंत्रिपदासाठी २१-१२-१० चा फॉर्म्युला

आजपासून सुरू होणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; अदानी, मणिपूरवर चर्चा करा! सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांची मागणी

यशस्वी, विराटचा शतकी तडाखा; भारताचा दुसरा डाव ४८७ धावांवर घोषित; ऑस्ट्रेलियाची ३ बाद १२ अशी अवस्था

यूपीतील हिंसाचारात तिघांचा मृत्यू; २० पोलिसांसह अनेक जण जखमी