मुंबई

बेस्ट उपक्रमातून वर्षभरात २०४४ कामगार सेवानिवृत्त ;बेस्टच्या परिवहन आणि विद्युत सेवांवर परिणाम

दरवर्षी बेस्टमधून सरासरी २००० कर्मचारी निवृत्त होतात, असे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Swapnil S

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील बसेसची संख्या घसरणीवर आली असताना कर्मचारी संख्येत ही मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. बेस्ट उपक्रमात कायमस्वरुपी सेवेत असलेले कर्मचारी सेवानिवृत्त होत असनाही व ल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांना कामाचा ताण वाढत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. २०२३ या वर्षांत उपक्रमाच्या सेवेतून २,०४४ कर्मचारी सेवा निवृत्त होत झाले आहेत. त्यात ५७२ वाहक, ३४१ चालक यांचा समावेश असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

बेस्ट उपक्रमात गेल्या ८ वर्षांपासून कर्मचाऱ्यांची भरती बंद आहे. बेस्ट प्रशासनाने कर्मचारी संघटनेसोबत २०१८ मध्ये सामंजसेसस्य करार केला होता. त्यात भाडेतत्त्वावर बस गाड्या घेतल्या तरी बेस्ट स्वतःच्या ३३३७ बसगाड्या व त्याला लागणारा कर्मचारी वर्ग ठेवला जाईल, असे म्हटले आहे; मात्र नवीन बसेस येत नाही आणि नवीन कर्मचारी भरती प्रक्रिया राबवली जात नाही. बेस्ट उपक्रमाचे अस्तित्व टिकवण्यासाठी बसेसची व कायमस्वरुपी कर्मचारी सेवेत घ्या, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे.

२८ हजार कर्मचारी वर्ग शिल्लक

बेस्टमध्ये नवीन भरती नाही. बेस्टमध्ये जवळपास ४५ हजार कर्मचारी होते. गेल्या ८ वर्षांत निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली असून, आता सद्या जवळपास २८ हजार कर्मचारी वर्ग शिल्लक राहिला आहे. त्यात विद्युत पुरवठा विभागात जवळपास साडेचार हजार कर्मचारी अधिकारी कार्यरत आहेत. दरवर्षी बेस्टमधून सरासरी २००० कर्मचारी निवृत्त होतात, असे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी