ANI
ANI
मुंबई

पश्चिम रेल्वेवरील मोटरमन, गार्डच्या २२६ कॅबमध्ये लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे लागणार

देवांग भागवत

रेल्वेवरील मोटरमन कॅबमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रकल्प मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. अखेर या प्रकल्पाला गती प्राप्त झाली असून पश्चिम रेल्वेवरील मोटरमन, गार्डच्या २२६ कॅबमध्ये लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू होणार आहे. नवीन वर्षात मे २०२३ मध्ये हे काम पूर्णत्वास जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे. या सीसीटीव्हींमुळे मोटरमन, गार्डच्या हालचालींवर बारीक नजर ठेवणे शक्य होणार असून रेल्वे दुर्घटना टाळण्यासाठी देखील हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे.

रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या मोटरमन केबिनवर सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतला होता. मात्र बराच अवधी उलटूनही हा प्रकल्प मार्गी लागला नाही. अखेर पश्चिम रेल्वे प्रशासनाने या निर्णयाची अंमलबजावणी करत मोटरमन, गार्डच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरु केले आहे. या सीसीटीव्हींमुळे लोकल चालवताना मोटरमनकडून होणाऱ्या चुका आणि त्यामुळे होणारे अपघात टाळणे शक्य होणार आहे. एखाद्या स्थानकात थांबा विसरणे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणे, लाल सिग्नल असतानाही गाडी पुढे नेणे अशा घटना अधूनमधून घडत असतात. त्यांचे प्रमाण कमी असले तरी त्यामुळे अपघात होऊ शकतात. याप्रकरणांमध्ये संबंधित दोषी कर्मचाऱ्याला शिक्षाही करण्यात येते. अशा घटनांमागील नेमकी कारणे शोधता यावीत म्हणून लोकलमधील मोटरमन आणि गार्ड केबीनच्या आत आणि बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. सध्या पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात ११३ लोकल असून त्यातील २२६ मोटरमन, गार्ड कॅबमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यासाठी दोन कोटी ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून यामुळे रेल्वेप्रवास करत असताना होणाऱ्या इतर दुर्घटनांवरही बारीक नजर ठेवता येणार आहे.

राज्यात ५५.५४ टक्के मतदान,तिसऱ्या टप्प्यात देशभरात ६२ टक्के मतदान!

Lok Sabha Elections 2024: मतदानादरम्यान मोठा गोंधळ, काँग्रेस नेत्याला मारहाण! बघा VIDEO

कोलकाताच्या खेळाडूंसाठी ‘ते’ २० तास धोक्याचे!

केजरीवालांच्या जामिनावरील निर्णय राखून ठेवला,न्यायालयीन कोठडीत २० मेपर्यंत वाढ!

मोदींनी सांगितले ४०० जागांचे ‘राज’कारण,मुस्लिम आरक्षणावर लालूंना केले लक्ष्य!