मुंबई

दिवसाढवळ्या २७ लाखांच्या रॉबरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश

या घटनेनंतर बलराकुमार सिंग यांनी माटुंगा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती.

Swapnil S

मुंबई : १० दिवसांपूर्वी दादर येथे दिवसाढवळ्या झालेल्या सुमारे २७ लाख रुपयांच्या रॉबरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश करण्यात माटुंगा पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यात एका महिलेसह सहा जणांना पोलिसांनी अटक केली. आकाश सुरेश चव्हाण, आतिश राजू मिसाळ, विजय भानुदास मोरे, सत्येंद्र श्रीकृष्णा पांडे, पारुल निलेश श्रीवास्तव आणि अनुज शामलाल शर्मा अशी त्यांची नावे असून ते सर्वजण ठाण्यातील टिटवाळा आणि घाटकोपरचे रहिवाशी आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी दोन लाखांची कॅश, सहा किलो कास्टिंग गोल्ड आणि फायलिंग हस्तगत केले आहेत. अटकेनंतर सहा जणांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. बलरामकुमार पोलेंद्र सिंग टॅक्सीने जात असताना दादर येथील रामी हॉटेलजवळ येताच अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर त्यांच्याकडील ३५ किलो कास्टिंग गोल्ड आणि गोल्ड फायलिंग असा २७ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी करून पलायन केले होते. या घटनेनंतर बलराकुमार सिंग यांनी माटुंगा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती.

आजपासून भारत आणि EFTA व्यापार करार अंमलात; पुढील १५ वर्षांत १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार

नवी मुंबई विमानतळाला अखेर ‘एअरोड्रोम परवाना’; ८ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्‌घाटन

रिलायन्स इन्फ्रावर ‘ईडी’चे छापे; फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप

गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट; १३६ कोटींचा ‘दरफरक’ जमा होणार

NPS आता अधिक आकर्षक; आजपासून १०० टक्के समभागात गुंतवणुकीची परवानगी