मुंबई

२७ आठवड्यांच्या गर्भपातासाठी १९ वर्षीय मुलगी हायकोर्टात; वैद्यकीय तपासणीचे निर्देश

प्रेमसंबंधातून गर्भवती राहिलेल्या १९ वर्षाच्या गर्भवती विद्यार्थिनीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

Swapnil S

मुंबई : प्रेमसंबंधातून गर्भवती राहिलेल्या १९ वर्षाच्या गर्भवती विद्यार्थिनीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मला २७ आठवड्यांच्या गर्भपाताला परवानगी द्या, अशी विनंती तिने हायकोर्टाला केली. याची गंभीर दखल घेत सुटीकालीन न्यायालयाचे न्या. नितीन बोरकर व न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठाने पुण्याच्या ससून हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या वैद्यकीय मंडळाला तातडीने २८ मे राेजी अहवाल सादर करण्याचे निर्देश देत याचिकेची सुनावणी २९ मे रोजी निश्‍चित केली.

आमचे प्रेमसंबंध असून नोव्हेंबरमध्ये आमचे शारीरिक संबंध घडून आले. त्यातच आपण गर्भवती असल्याचे समजले. मात्र आईवडिलांच्या भीतीपोटी ही बाब कोणालाही सांगितली नाही. त्यानंतर माझ्यात झालेल्या शारीरिक बदल झाल्याने ही गोष्ट आईला समजली. त्यानंतर ससून रूग्णालयात तपासणी केल्यानंतर २५ आठवड्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले. गरोदरपणाचे परिणाम स्वतःवर आणि गर्भातील बाळावर होऊ शकतात, असे मला वाटते. मला पुढील शिक्षण घ्यायचे असल्याने नियमानुसार २० आठवड्यांनंतर गर्भपातासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असल्याने गर्भपाताची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका मुलीने उच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेवर न्या. नितीन बोरकर व न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठासमोर तातडीने सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकील अ‍ॅड. कविता साळुंखे यांनी याचिकेला जोरदार आक्षेप घेतला. वैद्यकीय अहवाला नुसार गर्भाची वाढ होत असून तो सशक्त आहे. तसेच मुलीची बाळाला जन्म देण्याची आणि त्याला दत्तक देण्याची तयारी आहे. त्यामुळे गर्भपात करण्यास परवानगी देवू नये, अशी विनंती केली.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी