पियुष गोयल संग्रहित छायाचित्र
मुंबई

उत्तर मुंबईतून ४० नगरसेवक निवडून येतील - गोयल

मुंबई महानगरपालिका निवडणुका झाल्यास उत्तर मुंबई विभागातून महायुतीचे ४० नगरसेवक निश्चित जिंकून येणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केला.

Swapnil S

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुका झाल्यास उत्तर मुंबई विभागातून महायुतीचे ४० नगरसेवक निश्चित जिंकून येणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केला. मुंबई महानगरपालिकेत शनिवारी भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये उत्तर मुंबईतून मिळालेले यश पाहता ४० सहज जिंकता येतील आणि उत्तर मुंबईत महायुतीचेच नगरसेवक असतील, असा विश्वास गोयल यांनी यावेळी व्यक्त केला. 

राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला उत्तर मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. या ठिकाणी महायुतीचे पाच आमदार निवडून आले. या मतदारसंघांमध्ये तसेच आपल्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीला मानणारा मतदार वर्ग आहे. तसेच हिंदुत्वाला मानणारा आणि विकासाला मत देणारा मतदार या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचे ४० नगरसेवक या विभागातून निश्चित निवडून येतील, असा दावा पियूष गोयल यांनी केला आहे. या संदर्भात आपण महानगरपालिका स्तरावर सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करत असल्याचे गोयल यांनी यावेळी स्पष्ट केले.

VIDEO : अंधारात वळणावर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव कारची धडक; इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू, दरवाजे कापून काढले मृतदेह

Pune : दहीहंडी कार्यक्रमानंतर मोठी दुर्घटना; लोखंडी सांगाडा कोसळून ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू

Thane : गणेशोत्सव, नवरात्रीला मंडप भाडेमाफीचा प्रस्ताव; महासभेच्या निर्णयाकडे मंडळांचे लक्ष

मेगा IPO येतोय...; दशकाची प्रतीक्षा अखेर संपली, NSE च्या ३० हजार कोटींच्या आयपीओला सेबीची मंजुरी

स्क्रॅप रिक्षांवर होणार कारवाई; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम, नियमबाह्य रिक्षा रडारवर