मुंबई

५ लाख पर्यटकांचा प्रवास; ऐतिहासिक नेरळ-माथेरान टॉय ट्रेनला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; मिळाला तब्बल 'इतक्या' कोटींचा महसूल

प्रसिद्ध हिल स्टेशन असलेल्या माथेरानमध्ये सुट्टीच्या दिवशी पर्यटक मोठया संख्येने भेट देतात. निसर्गाने वनसंपदेची मुक्तपणे उधळण केलेल्या या ठिकाणी सतत पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. येथे चालणाऱ्या ऐतिहासिक नेरळ-माथेरान टॉय ट्रेनला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.

Swapnil S

मुंबई : प्रसिद्ध हिल स्टेशन असलेल्या माथेरानमध्ये सुट्टीच्या दिवशी पर्यटक मोठया संख्येने भेट देतात. निसर्गाने वनसंपदेची मुक्तपणे उधळण केलेल्या या ठिकाणी सतत पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. येथे चालणाऱ्या ऐतिहासिक नेरळ-माथेरान टॉय ट्रेनला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात ५ लाख पर्यटकांनी प्रवास केला असून, यामाध्यमातून मध्य रेल्वेला तब्बल ३ कोटी ५४ लाखांचा महसूल मिळाला आहे.

मध्य रेल्वेने नेरळ-माथेरान टॉय ट्रेन ११७ वर्षांपूर्वी सुरू केली. ही भारतातील काही ऐतिहासिक पर्वतीय रेल्वे सेवांपैकी एक आहे. गेल्या काही दशकांमध्ये मुंबई, पुणे आणि नजिकच्या परिसरातील नागरिकांसाठी माथेरान हे सर्वात जवळचे आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे. निसर्गरम्य ठिकाण असलेल्या या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. पर्यटकांना येथे सहज पोहोचता यावे यासाठी मध्य रेल्वे नेरळ ते माथेरानपर्यंतच्या पर्वतरांगांना प्रदक्षिणा घालणाऱ्या अरुंद गेज मार्गावर टॉय ट्रेन सेवा चालवते. यामध्ये अमन लॉज ते माथेरान दरम्यान शटल सेवेचा समावेश आहे.

सध्या मध्य रेल्वे नेरळ-माथेरान-नेरळ दरम्यान दररोज ४ सेवा आणि अमन लॉज-माथेरान-अमन लॉज दरम्यान १६ सेवा चालवते. त्यापैकी १२ सेवा दररोज चालतात आणि ४ विशेष सेवा फक्त शनिवार आणि रविवारी चालविण्यात येतात.

मध्य रेल्वेला मिळाला ३ कोटी ५४ लाखांचा महसूल

२०२३-२४ या आर्थिक वर्षात माथेरानमध्ये एकूण ५ लाख प्रवासी वाहतूक झाली. त्यात अमन लॉज ते माथेरान दरम्यान ३.७५ लाख प्रवासी आणि नेरळ ते माथेरान दरम्यानच्या १.२५ लाख प्रवाशांचा समावेश आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये अमन लॉज आणि माथेरान दरम्यान २ कोटी ४८ लाख आणि नेरळ आणि माथेरान दरम्यान १ कोटी ६ लाख असे एकूण ३ कोटी ५४ लाखांचे उत्पन्न मध्य रेल्वेला मिळाले आहे.

पॉड हॉटेलचे काम सुरू होणार

पर्यटकांची गैरसोय लक्षात घेऊन मध्य रेल्वेने माथेरान येथे पॉड हॉटेल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी हॉटेलच्या विकासाचे आणि कामकाजाचे कंत्राट ई-लिलावाद्वारे देण्यात आले आहे. यामध्ये सिंगल पॉड्स, डबल पॉड्स आणि फॅमिली पॉड्स असतील. यामुळे पर्यटकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी निवासाचे विविध पर्याय उपलब्ध असतील.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी