दिवाळीनिमित्त निवासी, शैक्षणिक संस्था, रुग्णालय, चॅरिटेबल ट्रस्टना अदानी इलेक्ट्रीसिटीने खास ऑफर आणली आहे. कंपनीतर्फे ५ स्टार पंखा व फ्रीज सवलतीच्या दरात मिळणार आहे. या उत्पादनामुळे विजेचे बिल कमी होण्यास मदत मिळणार आहे.
अदानी इलेक्ट्रीसिटीच्या ‘डीएसएम’ ऑफरनुसार पंचतारांकित पंख्यावर ४२ टक्के सवलत मिळेल. रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या या पंख्याला पारंपरिक पंख्यापेक्षा ६० टक्क्यांपेक्षा कमी वीज लागते. यासाठी कंपनीने ओरिएंट, बजाज व सुपरफॅन आदी कंपन्यांसोबत करार केला आहे ‘डीएसएम’ योजनेत विजेचा वापर कमी करणारी उत्पादने वापरली जातात. त्याचा फायदा ग्राहकांना होत असतो. कंपनीच्या योजनेनुसार, ५ स्टार सिलिंग पंखा २२८४ रुपयांत मिळणार आहे. त्याची बाजारातील किंमत ४ हजार रुपये आहे, तर नेहमीचा सिलिंग पंखा ३०४९ रुपयांना मिळेल. बाजारात त्याची किंमत ५२३५ रुपये आहे. यामुळे ग्राहकांचे विजेचे बिल कमी येणार आहे. कारण पारंपरिक पंख्याला ७५ वॉट वीज लागते, तर ५ स्टार पंख्याला केवळ ३० वॉट वीज पुरते. या प्रकल्पांतर्गत कंपनीने १६०० हून अधिक पंखे पुरवले आहेत. कंपनीने जुन्या फ्रीजच्या बदल्यात नवीन ५ स्टार फ्रीज घेतल्यास ४७ टक्के सवलत देण्याची घोषणा केली. ग्राहकांना हा फ्रीज १२,३०० ते १३,८०० रुपयांना मिळेल. अदानी इलेक्ट्रीसिटीने गोदरेज अॅण्ड बॉयसी कंपनीशी करार केला. या फ्रीजमुळे महिन्याचे विजेचे बिल कमी होण्यास मदत मिळेल. कारण फ्रीज हा २४ तास सुरू असतो. कंपनीने २५०० फ्रीज ग्राहकांना वाटले आहेत.अदानी इलेक्ट्रीसिटीच्या प्रवक्त्याने सांगितले की, ऊर्जा बचत करणारी साधनांचे वाटप करून ग्राहकांचे महिन्याचे बिल कमी होणार आहे. तसेच २०३० पर्यंत १ अब्ज टन कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत मिळेल. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी असून, ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर आहे.