एक्स @mieknathshinde
मुंबई

सिद्धिविनायक मंदिराच्या कायापालटासाठी ५०० कोटी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून मुंबईचा विकास

दादर येथील सिद्धिविनायक मंदिराचा कायापालट होणार असून यासाठी ५०० कोटींच्या निधीची तरतूद केली आहे.

Swapnil S

मुंबई : दादर येथील सिद्धिविनायक मंदिराचा कायापालट होणार असून यासाठी ५०० कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. तसेच माहीम येथील रखडलेल्या म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकास होणार आहे. खासगी विकासकांवर अवलंबून न राहता एमएमआरडीए, म्हाडा, सिडको व मुंबई महापालिका आदींच्या मदतीने क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून मुंबईचा विकास करण्यात येणार आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मी आम्ही तिघेही विकासासाठी पुढे आलो आहोत, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सिद्धिविनायक मंदिर, माहीम मतदारसंघातील म्हाडाच्या इमारतींची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

मुंबईत म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकास रखडला असून अनेक विकासक घर मालकाला भाडे न देता प्रकल्प अर्धवट सोडून गेले आहेत. प्रकल्प अर्धवट सोडून गेलेल्या विकासकांना काढून टाकणार आहे. सामान्यांना परवडणारे व प्रशस्त असे घर देण्यासाठी वेळ पडल्यास नियम, कायद्यात बदल करावयाचा असल्यास तेही करण्यात येईल. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मंत्रिमंडळाच्या समोर असे निर्णय आणले जातील. रखडलेल्या पुनर्विकासाच्या कामांना सामूहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून गती देण्यात येईल. ठाण्यातही अशा पद्धतीने सामूहिक पुनर्विकास योजना सुरू झालेली आहे. सामूहिक पुनर्विकास योजना राबविताना येत असलेल्या अडचणी दूर करण्यात येतील, असेही शिंदे म्हणाले.

एसआरए, म्हाडा, एमआयडीसी, एमएमआरडीए, सिडको व बीएमसी या सर्व यंत्रणांच्या समन्वयाने सामूहिक पुनर्विकासाची योजना राबविण्यात येईल. या सामूहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून प्राथमिक सोयी सुविधांची उपलब्धता करून देण्यात येईल. यामध्ये बगीचा, आरोग्याच्या सुविधा, खुले मैदान आदींचा समावेश असेल. शासन लवकरच गृहनिर्माण धोरण आणत आहे. यामध्ये म्हाडाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, काम करणाऱ्या महिला, गिरणी कामगार, पोलीस, गावठाण कोळीवाडा यांच्यासाठी घरांची उपलब्धता आणि परवडणारी घरे, परवडणारी भाड्याची घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असणार आहे, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गुरुवारी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रभादेवी येथील सहा समूह पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी केली. पाहणीनंतर दादर, माहिम व प्रभादेवी विभागातील प्रलंबित पुनर्विकास संदर्भात आढावा कार्यक्रम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. व्यासपीठावर श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासचे अध्यक्ष सदा सरवणकर, उपाध्यक्ष जैस्वाल, एसआरएचे मिलिंद शंभरकर, कल्याणकर आदींसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला

मुख्यमंत्री असताना गेल्या अडीच वर्षांत मुंबईचा विकास झपाट्याने होत असून आताही मुंबईचा विकास थांबणार नाही. बाबासाहेबांचे विचार घेऊन पुढे निघालो आहोत. त्यामुळे मुंबईचा विकास होत असताना मी कधीही श्रेयासाठी पुढे पुढे केले नाही. मात्र काहीजण घरात बसून श्रेय घेण्यासाठी धडपडत आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने कौल दिला तो महायुतीच्या कामांकडे पाहून. श्रेयासाठी घरात बसून काम होत नाही. विधानसभा निवडणुकीत जनतेने एडिट केले आणि डिलीट केले. त्यामुळे कसले क्रेडिट घेताय, असा टोला एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

Maratha Reservation : मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी अखेर आझाद मैदानात; बेमुदत आंदोलनावर ठाम, पावसातही आंदोलकांचा उत्साह कायम

लातूर-नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; बचावासाठी लष्कराची मदत, जनजीवन विस्कळीत

...तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप; २९,९६५ गणेशमूर्तीच विसर्जन

...तर भारताचा 'टॅरिफ' कमी करू! व्हाइट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांचे वक्तव्य