मुंबई

भय इथले संपत नाही! हजारो लोकांचा जीव दरडीच्या छायेत कुर्ला, भांडुप, विक्रोळीत ६६ ठिकाणे धोकादायक स्थलांतरासाठी पावसाळ्यापूर्वी नोटीस बजावणार

Swapnil S

गिरीश चित्रे / मुंबई

पावसाळा म्हटलं की भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर, कुर्ला, साकीनाका याठिकाणी दरड कोसळण्याचा धोका सर्वाधिक आहे. भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला या ठिकाणी दरड कोसळण्याची तब्बल ६८ स्पॉट आहेत. एकट्या भांडुप विक्रोळीत तब्बल ४२ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका असून यापैकी १३ डेंजर स्पॉट म्हणून घोषित केले आहे.

दरम्यान, दरड कोसळण्याची ६८ ठिकाण असून, याठिकाणी सुमारे ८० हजारांहून अधिक लोकवस्ती आहे. डोंगर उतारावर राहणाऱ्या रहिवाशांच्या जीवाची काळजी घेत कोट्यवधी रुपये खर्चून संरक्षक भिंत उभारणे अशी कामे केली जात असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येतो. तरीही दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडतात. त्यामुळे हजारो लोकांचा जीव दरडीच्या छायेत असून, भय इथले संपत नाही. दरम्यान, याठिकाणी राहत असलेल्या लोकांना पावसाळ्यात चार महिने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे यासाठी नोटीस बजावण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

भांडुप, विक्रोळी कांजूर मार्ग याठिकाणी डोंगराळ भाग मोठ्या प्रमाणात असून भांडुपमध्ये ४२ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे. यात ४२ पैकी १३ भाग अती डेंजर स्पॉट म्हणून घोषित केले आहे. तर घाटकोपर मध्ये १७ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका असून, याठिकाणी सुमारे चार हजार झोपड्या आहेत. तर कुर्ला येथे ९ ठिकाण दरडीच्या छायेत ५०० हून अधिक झोपड्या डेंजर झोनमध्ये आहेत. पावसाळ्यात कधीही घटना घडू शकते हे माहीत असताना अनेक जण पालिकेच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले जाते. डोंगर उतारावर राहणाऱ्या रहिवाशांच्या जीवाची काळजी घेत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी डोंगर उतारावर राहणाऱ्यांना नोटीस बजावण्यात येते. नोटीस बजावल्यानंतर ही संबंधित कुटुंब स्थलांतरित होण्यास तयार नसेल तर ती व्यक्तीच्या जबाबदारी त्याठिकाणी राहते, असे पालिकेच्या नोटिसीत नमूद केले जाते.

पोस्टर्स, बॅनर्स, भिंतीपत्रक लावत जनजागृती!

भांडुप एस वॉर्डात ४२ दरड कोसळण्याचे स्पॉट असून, यापैकी २३ ठिकाण दरड कोसळण्याच्या दृष्टीने डेंजर झोनमध्ये आणले आहे. दरम्यान, कोणाच्या जीवावर बेतू नये यासाठी पावसाळ्यात चार महिने स्थलांतरित व्हावे म्हणून नोटीस, म्हणून नोटीस बजावण्यात येते. तसेच पोस्टर्स, बॅनर्स, फलक लावले जातात, असे पालिकेचे एस वॉर्डाचे सहाय्यक आयुक्त भास्कर कसगीकर यांनी सांगितले.

तीन वर्गात दरड कोसळण्याच्या घटनांची वर्गवारी

अति तीव्र, मध्यम व साधारण असे तीन प्रकार असतात आणि त्यानंतर नोटीस बजावण्यात येते, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

घाटकोपर येथे १७ ठिकाणी दरड कोसळण्याच्या धोका

चार हजार झोपड्या बेकायदेशीर, पावसाळ्यापूर्वी स्थलांतरित व्हावे यासाठी नोटीस देणार

कुर्ला येथे ९ ठिकाण दरडीच्या छायेत

५०० हून अधिक झोपड्या डेंजर झोनमध्ये, २५ हजारांहून अधिक लोकवस्ती

भांडुप एस वॉर्डात ४२ ठिकाणं दरडी कोसळण्याचा धोका

त्यात १३ स्पॉट डेंजर, सुर्यानगर ते खिंडी पाडा डोंगराळ भागात तीन हजार झोपड्या, ५० हजार लोकवस्ती

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

काय सांगता? एप्रिलमध्ये तब्बल ३ लाख लोकांनी खरेदी केली 'ही' बाईक, पाहा लिस्ट

मुंबई: धरणांतील जलसाठा घटला; १५ जुलैपर्यंत तहान भागेल इतकाच पाणीसाठा

World Bee Day 2024: जागतिक मधमाशी दिन,का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या महत्त्व