मुंबई

पेट्रोकेमिकल माल खरेदी करून ६७ लाखांचा अपहार

उत्तर प्रदेशच्या दोन व्यावसायिकांविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.

Swapnil S

मुंबई : पेट्रोकेमिकल माल खरेदी करून सुमारे ६७ लाखांचे पेमेंट न करता एका खासगी कंपनीची फसवणूक झाल्याचा प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेशच्या दोन व्यावसायिकांविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. रेखा डोग्रा आणि अमित डोग्रा अशी या दोघांची नावे आहेत. सप्टेंबर २०२३ महिन्यात रेखा आणि अमित डोग्रा यांनी जिग्नेश शहा यांच्या कंपनीकडून टॉल्विन आणि सायक्लो हेक्सानन या प्रोडेक्टची माहिती विचारली होती. ही माहिती दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या कंपनीकडे जवळपास पाऊण कोटींच्या मालाची ऑर्डर दिली होती. डिलीव्हरीनंतर कंपनीने त्यांना नऊ लाखांचे पेमेंट केले. मात्र उर्वरित ६७ लाख ४० हजाराचा अपहार करुन कंपनीची फसवणुक केली होती.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Mumbai : ८८ बेकऱ्यांना निर्वाणीचा इशारा; BMC ची कठोर कारवाई

Mumbai : सिग्नल यंत्रणेची देखभाल रखडली; नियंत्रकांच्या देखभालीसाठी पालिकेची ११ कोटींची फेरनिविदा

डीजेला कोणत्या आधारे परवानगी दिली जाते? कोर्टाने दाखल केली सुमोटो; आज सुनावणी

नवीन राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेला विरोध वाढला; कर्मचारी, अभियंत्यांचा आंदोलनाचा इशारा