मुंबई

देशात चालू वर्षात ७५ वाघांचा मृत्यू ;राष्ट्रीय व्याघ्र संवर्धनाची आकडेवारी जाहीर

वाघाचं संरक्षण करण्यासाठी जागतिक स्तरावर २९ जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो

देवांग भागवत

आठवड्यापूर्वीच म्हणजेच २९ जुलै रोजी ‘जागतिक व्याघ्र दिन’ साजरा करण्यात आला. वाघाचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या प्रजातीला जपण्यासाठी जागतिक स्तरावर हा दिवस साजरा केला जातो; मात्र ज्या देशाचा राष्ट्रीय प्राणीच मुळात वाघ आहे, त्याच देशात चालू वर्षात ७५ वाघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही मोठी शोकांतिका आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) यांनी याबाबत आकडेवारी जाहीर केली असून सर्वाधिक वाघांचे मृत्यू मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यात झाले आहेत.

वाघाचं संरक्षण करण्यासाठी जागतिक स्तरावर २९ जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो. व्याघ्र दिनाला सुरुवात रशियामधून झाली आहे. सेंट पीटर्सबर्ग टाइगर समीट यांनी २०१० साली हा दिवस साजरा करण्याची संकल्पना मांडली होती. तेव्हापासून मग व्याघ्र दिन साजरा होऊ लागला; मात्र वाघाची घटती संख्या आणि जगभरात वाघांचे संवर्धन

१० वर्षांत १८४ वाघांचा मृत्यू

‘एनटीसीए’नुसार महाराष्ट्रात २०१२ ते ऑगस्ट २०२२ या काळात १८४ वाघांचा मृत्यू झाला आहे. २०१२-२०१९ पर्यंत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (TATR) मध्ये १८ वाघांचा मृत्यू झाला, जो राज्यात सर्वाधिक आहे. दरम्यान, नागपूर, चंद्रपूर, अकोला, गोंदिया, उमरेड, भंडारा, ब्रम्हपुरी, आल्लापल्ली आणि गडचिरोली या वनक्षेत्रात चालू वर्षात १६ वाघांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक