मुंबई

मढ किनाऱ्यावर बोट बुडाली; मासेमारी बोटीची मालवाहू जहाजाला धडक

मुंबईतील मालाड परिसरातील मढ कोळीवाडा किनाऱ्याजवळ मासेमारीची एक बोट मालवाहू जहाजाच्या धडकेनंतर रविवारी पहाटे बुडाली.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील मालाड परिसरातील मढ कोळीवाडा किनाऱ्याजवळ मासेमारीची एक बोट मालवाहू जहाजाच्या धडकेनंतर रविवारी पहाटे बुडाली. बोट बाहेर काढण्यात यश आले असून या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

आठ अन्य बोटींच्या गटाने त्या भागातील बुडालेली बोट काढून किनाऱ्यावर आणली, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. बोटीच्या बचाव कार्यात नौदल आणि तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांनीही सहाय्य केले, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

मढ कोळीवाड्यातील हेमदीप हरीशचंद्र टिपरी यांची ही बोट होती. ती मालवाहू जहाजाने धडक दिल्याने बुडाली. स्थानिक बचाव गटाने ती पाण्याबाहेर काढून किनाऱ्यावर आणली. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसून बोटीवरील खलाशाला वाचवण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या

‘आत्मनिर्भर’ता हाच विकसित भारताकडे जाण्याचा मार्ग; ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन

भारताच्या ‘एज्युकेट गर्ल्स’ला रॅमन मॅगसेसे पुरस्कार; पहिली भारतीय स्वयंसेवी संस्था ठरली