मुंबई

वस्तू आणि सेवा कराच्या बनावट पावत्या तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

जो बनावट वस्तू आणि सेवा कर पावत्या प्राप्त करण्यासाठी आणि जारी करण्यासाठी ही आस्थापना चालवत असे

प्रतिनिधी

केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाच्या दक्षिण मुंबई आयुक्तालयाच्या अधिकाऱ्‍यांनी बनावट वस्तू आणि सेवा कराच्या पावत्या तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीने सुमारे २२ कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा करावरचा इनपुट टॅक्स क्रेडिट बुडवण्यासाठी १८५ कोटी रुपयांच्या बनावट पावत्या तयार केल्या होत्या. आयुक्तालयाने करचोरीमध्ये सहभागी असलेल्या दोघांना अटक केली आहे. त्यापैकी एक जण आदित्य एंटरप्रायझेस या वाळकेश्वर स्थित आस्थापनेचा मालक आहे. त्याने आर्थिक फायद्यांच्या बदल्यात ही आस्थापना तयार करण्यासाठी आणि वापरण्यासाठी आपली ओळख वापरण्यास मान्यता दिली होती. दुसरी व्यक्ती त्याचा मित्र आहे, जो बनावट वस्तू आणि सेवा कर पावत्या प्राप्त करण्यासाठी आणि जारी करण्यासाठी ही आस्थापना चालवत असे.

वस्तू आणि सेवा कर विभागाच्या दक्षिण मुंबई आयुक्तालयाच्या चोरीविरोधी शाखेने या आस्थापनेविरुद्ध तपास सुरू केला. व्यवसायाचा सांगितलेला पत्ता हा निवासी परिसर असून तिथे कोणत्याही व्यावसायिक घडामोडी होत नसल्याचे तपासादरम्यान आढळून आले. तपासात असेही समोर आले आहे की, या आस्थापनेने ११.०१ कोटी रुपयांच्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा केला होता आणि १०.९६ कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट प्राप्त केला होता. या कर क्रेडिटचा लाभ घेण्यासाठी आणि तो पास करण्यासाठी १८५ कोटी रुपयांच्या बोगस पावत्या, कोणत्याही वस्तूंचा पुरवठा किंवा पावती न घेता, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा, २०१७ च्या तरतुदींचे घोर उल्लंघन करून तयार करण्यात आल्या होत्या. या कर फसवणुकीच्या प्रकरणात दिल्ली, मुंबई, कानपूर, ठाणे आणि नवी मुंबई या शहरांसह विविध राज्यांतील २५० हून अधिक व्यावसायिक संस्थांचा सहभाग आहे. तपासादरम्यान, गोळा केलेल्या पुराव्याच्या आधारे आणि या कर फसवणुकीतील आरोपींच्या भूमिकेची दखल घेत, दोन्ही आरोपींना २२ जुलै रोजी, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा, २०१७ च्या कलम १३२चे उल्लंघन केल्याबद्दल, वस्तू आणि सेवा कर कायदा, २०१७ च्या कलम ६९ अंतर्गत अटक करण्यात आली.

कोइंबतूर विमानतळाजवळ गँगरेप प्रकरण; पोलिसांवर हल्ला करून पळण्याचा प्रयत्न करणारे तिघे अटकेत

ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला गती; देशातील सर्वात लांब शहरी बोगदा

डॉ. संपदा मुंडे मृत्यू प्रकरण : बेटी पढ़ी, पर बची नहीं... डॉक्टरांचे काम बंद आंदोलन; अधिकाऱ्यांचाही इशारा

बंदची अधिसूचना, पण शहाड उड्डाणपुलावरून वाहतूक सुरूच; पहिल्या दिवशी डांबरीकरणाचे काम सुरू नाहीच

अनिल अंबानींच्या अडचणीत आणखी वाढ! ३ हजार कोटींची संपत्ती जप्त