मुंबई

पवई तलावाजवळ पुरुषाचा मृतदेह सापडला

मद्यपान केले की नाही हे शवविच्छेदन अहवालातून कळणार

नवशक्ती Web Desk

मुंबई : पवई तलावाजवळ चंद्रशेखर हळदळकर (३९) या रिक्षा चालकाचा मृतदेह सोमवारी सकाळी सापडला. हा मृतदेह घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात नेण्यात आला. याप्रकरणी पवई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली.

पोलिसांनी सांगितले की, चंद्रशेखर हळदणकर हे घाटकोपरच्या असल्फा येथील रहिवासी आहे. ते तीन दिवसांपासून बेपत्ता होते. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली नव्हती. त्यांच्या शरीरावर कोणतीही खूण आढळली नाही. त्यांनी मद्यपान केले की नाही हे शवविच्छेदन अहवालातून कळणार आहे. ते अविवाहित होते तसेच त्यांना दारूचे व्यसन होते. तसेच ते वैफल्यग्रस्त होते.

Mumbai : घराबाहेर खेळत असताना दोन मुलींचे अपहरण; पोलिसांनी उत्तराखंडमधून केली सुखरूप सुटका, आरोपी अटकेत

१५ वर्षांचा संसार संपला! आदिनाथ कोठारे-ऊर्मिला कानेटकर विभक्त; मुलीबाबत पोस्टमध्ये काय म्हटलं?

Mumbai Hit-and-Run : विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या दुचाकीने ९ वर्षीय मुलीला उडवले; चालक फरार, CCTV मध्ये घटना कैद

मेट्रोच्या कशेळी डेपोचे काम वेगात; २३ टक्के बांधकाम पूर्ण, गाड्यांची चाचणी सुरू होणार

Mumbai : सायन प्रतीक्षानगरमध्ये जमीन खचली; SRA कडून विकासकाला नोटीस - विकासकांकडून सुरक्षेच्या उपाययोजना