मुंबई

वांद्रेत तीन मजली इमारत कोसळली

दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, १८ जण जखमी झाले

प्रतिनिधी

दरवर्षी पावसाळ्यात इमारत, अथवा इमारतीचे भाग कोसळण्याच्या घटना घडतात; मात्र बुधवारी मध्यरात्री वांद्रे पश्चिम महाराष्ट्र नगर येथील तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, १८ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी १७ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर एका जखमीला वांद्रे भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्याने सांगितले.

वांद्रे पूर्व व पश्चिम भागात रेल्वे स्थानकाजवळ अनधिकृत बांधकाम झाल्याची ओरड दुर्घटना घडल्यावर नेहमीच करण्यात येते. वांद्रे महाराष्ट्र नगर येथे तीन ते चार मजली घरे उभारण्यात आली आहेत. गुरुवारी रात्री १२.२० वाजण्याच्या सुमारास तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत १९ जण जखमी झाले होते. जखमींपैकी शाहनवाज आलम (५५) यांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. तर १८ जखमींना भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

नूर आलम शेख (२३), महंमद शबीर शेख (४०), शमीफुल हक (३६), महंमद शातो रब (३३), जुल्फिगार शेख (३२), शमी अहमद शेख (४०), अली अहमद शेख (६५), सलीम उस्मान शेख (१६), महंमद अल्फाज शेख (६३), महंमद नर सलाम शेख (६६), महंमद जानी फेल (३६), जसीरुद्दीन शेख (५०), महमंद फैजान शेख (१३), महंमद मन्वार आलम (३६), मंगल आलम शहाबुद्दीन शेख (४६), महंमद एहेसान आलम (३२), महंमद जहांगीर शेख (४६) व रशीद (३५).

२२ सप्टेंबरपासून नवे GST दर लागू; कोणत्या वस्तू स्वस्त, तर कोणत्या राहणार स्थिर? वाचा सविस्तर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नवी झळाळी घेऊन येतेय 'मोनोरेल'; पाहा काय आहेत नवे बदल?

UPSC उमेदवार पडताळणीसाठी AI ची मदत घेणार

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; घणसोली-शीळफाटा दरम्यान पाच किमीचा बोगदा पूर्ण

Kalyan-Dombivli : रहिवाशांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई - शिंदे