मुंबई

मराठा आरक्षणासाठी जालन्याच्या तरुणाने घेतला मुंबईत गळफास ; मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांचा दावा

सुनिल कावळे असं मृत ४५ वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. सुनिल हा जालना जिल्ह्यातील असल्याचं सांगितलं जात आहे.

नवशक्ती Web Desk

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्यातील मराठा समजा आक्रमक होत चाललं आहे. यात काही जणांकडून टोकाची पावले उचलली जात आहेत. मुंबईममध्ये जालन्याच्या एका तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वांद्रे पूर्व भागात पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या पूलावर या व्यक्तीने गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला. या तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याचा दावा मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केला आहे.

सुनिल कावळे असं मृत ४५ वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. सुनिल हा जालना जिल्ह्यातील असल्याचं सांगितलं जात आहे. सुनिलने काल रात्री ही आत्महत्या झाली असून त्याच्या बॅगमध्ये सुसाईड नोट देखील सापडली आहे. सध्या पोलीस सुनिल मुंबईत कधी आला? त्याच्यासोबत कोण होतं? याचा शोध घेत आहेत. सुनिलचा मृतदेह सायन हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.

या आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर विनोद पाटील यांनी "खचून जाऊ नका, लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊच नका", असं आवाहन मराठा तरुणांना केलं आहे. तसंच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालनाच्या तरुणाने आत्महत्या केल्याचं सांगत या प्रकरणी खेरवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे शिष्टमंडळ सायन हॉस्पिटलमध्ये जाऊन जाऊन मयत तरुणाच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने २९१८ साली राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या १५ % असलेल्या मराठा समाजाला १३ % आरक्षण दिलं होतं. मात्र, २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचा निर्णय रद्द केला आणि मराठा आरक्षण हे असंवैधानिक असल्याचं सांगितलं व त्यास अवैध ठरलवं. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने एकमताने याबाबतचा निर्णय दिला होता. त्यानंतर आता राज्य सरकारकडून पुन्हा मराठा आरक्षण देण्यासंदर्भात हालचालवी सुरु आहेत.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक