मुंबई

Mumbai : ब्रेक फेल, सलग दुसऱ्या दिवशी बेस्ट बसचा अपघात; बस व खासगी गाडीचा चालक जखमी

मागाठाणे डेपोची डागा ग्रुपची भाडेतत्त्वावरील बस क्रमांक ७४९९ एम एच ओ -०३ सीव्ही ७४५४ या बसचा गुरुवारी पहाटे ६.२० वाजता आरे कॉलनीतील छोटा काश्मीर येथे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला.

Swapnil S

मुंबई : मागाठाणे डेपोची डागा ग्रुपची भाडेतत्त्वावरील बस क्रमांक ७४९९ एम एच ओ -०३ सीव्ही ७४५४ या बसचा गुरुवारी पहाटे ६.२० वाजता आरे कॉलनीतील छोटा काश्मीर येथे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला. या घटनेत बस व समोरून येणारी खासगी टॅक्सी यांची धडक झाली. या अपघातात टॅक्सी चालक व बस चालक जखमी झाले आहेत.

जखमींना जोगेश्वरी येथील ट्राॅमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, बेस्ट बस चालकाविरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात भाडेतत्त्वावर बसेसचा समावेश करण्यात आला आहे. भाडेतत्त्वावरील बसेस ताफ्यात दाखल झाल्यापासून अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागाठाणे बस आगारातील बेस्ट बस गुरुवारी सकाळच्या सुमारास गोरेगाव येथून आदर्श नगर येथे जात असताना बसचा ब्रेक फेल झाला आणि समोरुन येणाऱ्या खासगी चारचाकी वाहनाला धडकली. या घटनेत बेस्ट बस चालक व खासगी वाहनाचा चालक जखमी झाला असून उपचारासाठी ट्राॅमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत बेस्ट उपक्रमाचे अधिकारी व संबंधित पोलीस पुढील तपास करीत आहेत.

ठाण्यात बुधवारी पाणीपुरवठा बंद; नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरण्याचे पालिकेचे आवाहन

Mumbai : "जे कमावतो ते सगळं CNG मध्येच जातं!" दरवाढीनंतर टॅक्सी चालकांचा संताप; पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Jalna : सरकारसोबतची चर्चा निष्फळ; मनोज जरांगेंचे अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण सुरू

पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने केली इच्छामरणाची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं पत्र

काय सांगता! दादरचा 'अशोक वडा पाव' जगातील सर्वाधिक प्रतिष्ठित सँडविचच्या यादीत; टॉप ४० मध्ये मिळवले स्थान