FPJ
मुंबई

एका दिवसात २३१ मेट्रिक टन राडारोडा जमा; १२७ किमीच्या रस्त्यांची धुलाई

सखोल स्वच्छ अभियानाअंतर्गत पालिकेच्या २४ डी-वॉर्डात शनिवारी एकाच दिवसात ११२ मेट्रिक टन राडारोडा (डेब्रिज), २९ मेट्रिक टन टाकाऊ मोठ्या वस्तू आणि ९० मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले.

Swapnil S

मुंबई : सखोल स्वच्छ अभियानाअंतर्गत पालिकेच्या २४ डी-वॉर्डात शनिवारी एकाच दिवसात ११२ मेट्रिक टन राडारोडा (डेब्रिज), २९ मेट्रिक टन टाकाऊ मोठ्या वस्तू आणि ९० मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. तर, १२७ किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करण्यात आले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर छोट्या मोठ्या नाल्यातून तरंगता कचरा काढणे, उद्यानांची स्वच्छता, शाळा परिसराची स्वच्छता या कार्यवाहीबरोबरच पावसाळी आजार, संसर्गजन्य आजाराबाबत जनजागृती करण्यात आली आहे.

मुंबई महानगरात गत ३२ आठवड्यांपासून सखोल स्वच्छता मोहीम सुरू आहे. या मोहिमेला व्यापक स्वरूप देत दर शनिवारी प्रत्येक प्रशासकीय विभागात नियमितपणे स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. संपूर्ण २२७ प्रभागांमध्ये ही मोहीम निरंतर सुरू आहे. या अंतर्गत शनिवारी सर्व प्रशासकीय विभागात (वॉर्ड) लोकसहभागातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनानुसार आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत विभाग पातळीवर व्यापक कार्यवाही करण्यात आली. यो मोहिमेत १ हजार ७७२ कामगार अथवा कर्मचाऱ्यांनी १५२ संयंत्राच्या सहाय्याने ही कामगिरी केली आहे. जेसीबी, डम्पर, कॉम्पॅक्टर, कचरा संकलन करणारी वाहने, पाण्याचे टँकर अशी विविध वाहने आणि फायरेक्स मशीन, मिस्टींग मशीन आणि अन्य अद्ययावत यंत्रणाही यात समाविष्ट होती.

या भागात डीप क्लिनिंग मोहीम

ए विभागात प्रभाग क्रमांक २२६, वूड हाऊस मार्ग, विंडी हॉल मार्ग, रामभाऊ साळगावकर मार्ग, बी विभागात यशवंतराव चव्‍हाण मार्ग, महंमदअली मार्ग, सी विभागात प्रभाग क्रमांक २२२ मधील जगन्‍नाथ शंकरशेट मार्ग, डी विभागात मुंबई सेंट्रल येथील ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसर, ई विभागात नायर रूग्‍णालय मार्ग, जी दक्षिण विभागात प्रभाग क्रमांक १९६ जयवंत पालकर मार्ग, एच पूर्व विभागात नंदादीप उद्यान, नौपाडा स्‍मशानभूमी, शिक्षक वसाहत, एच पश्चिम विभागात प्रभाग क्रमांक ९७ - ९८, स्‍वामी विवेकानंद मार्ग, खार पोलिस ठाणे ते सांताक्रुज बस आगार, के पूर्व विभागात प्रभाग ८५ मधील झोपडपट्टी व तत्सम परिसर, एल विभागात महाराष्ट्र काटा, लालबहादूर शास्‍त्री मार्ग, एम पूर्व विभागात मानखुर्द येथील चिता कॅम्‍प परिसर, एन विभागात घाटकोपर येथील रमाबाई नगर, कामराज नगर, पी दक्षिण विभागात प्रभाग क्रमांक ५४ येथील सोनावाला मार्ग, पी उत्तर विभागात प्रभाग क्रमांक ३४ मधील लगून मार्ग, आर दक्षिण विभागात कांदिवली अग्निशमन केंद्र ते स्‍वामी विवेकानंद मार्ग, आर उत्तर विभागात दहिसर पूर्व स्थित प्रभाग क्रमांक ३ केतकीपाडा, समता नगर, कानडे मैदान, टी विभागात मुलुंड पूर्व येथील प्रभाग क्रमांक १०८ मधील नागरी वसाहत आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?