Unnsplash
मुंबई

हवामानाचा आता अचूक अंदाज; चार नवीन रडारसह तंत्रज्ञानाचा विस्तार

आपत्ती व्यवस्थापन आणि हवामान अंदाजाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकताना मुंबईला चार नवीन 'एक्स बँड रडार' उपलब्ध होणार असून देशातील पहिल्या शहरी रडार जाळ्याचा यामुळे विस्तार होणार आहे.

Swapnil S

रुचा कानोलकर/मुंबई

आपत्ती व्यवस्थापन आणि हवामान अंदाजाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकताना मुंबईला चार नवीन 'एक्स बँड रडार' उपलब्ध होणार असून देशातील पहिल्या शहरी रडार जाळ्याचा यामुळे विस्तार होणार आहे.

अरबी समुद्रातील चक्रीवादळांची वाढती संख्या आणि शहरातील वाढत्या अनियमित पावसाच्या नमुन्यांमुळे या प्रगत प्रणाली हवामानातील बदल या यंत्रणेद्वारे टिपले जातील. या विस्तारामुळे पर्जन्यमानाच्या संकटांचा अंदाज सुधारणे अपेक्षित असून देशाच्या आर्थिक राजधानीसाठी वेळेवर सूचना मिळणे शक्य होईल.

भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या रडार प्रणालीमुळे मुंबईची आपत्तीपूर्व तयारी अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. संप्रेषण, सहाय्य आणि समन्वय हे अचूक हवामान माहिती प्रदान करण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे डॉ. रविचंद्रन यांनी रडारच्या प्रक्षेपणाच्या वेळी सांगितले. रडारचे हा नेटवर्क विस्तार उपयुक्त ठरत असून यंत्रणेतील त्रुटी कमी करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडत आहे, असेही ते म्हणाले.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील कुलाबा येथील करिअप्पा सभागृहात आयोजित केलेल्या स्टेकहोल्डर कार्यशाळेत उद्घाटनाचा सोहळा झाला. यावेळी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते.

नवीन रडार हे चार मोक्याच्या ठिकाणी बसवण्यात आले आहेत. पनवेलमधील एम्निटी युनिव्हर्सिटी, वसई-विरारमधील विद्यानिधी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, डी.जे. विलेपार्ले येथील संघवी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि कल्याण-डोंबिवलीतील नेतिवली जलशुद्धीकरण केंद्र. यामुळे कुलाबा येथे असलेले जुने 'एस बँड' रडार आणि वेरावली येथील 'सी बँड' रडारसह मुंबईची एकूण रडार संख्या आता सहा झाली आहे.

'एक्स बँड' रडारची क्षमता ६० किलोमीटरपर्यंतची आहे.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस