मुंबई

१६ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीस अटक

या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांनी दुजोरा दिला आहे. तक्रारदाराची पीडित सोळा वर्षांची मुलगी आहे.

Swapnil S

मुंबई : १६ वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचारप्रकरणी प्रकाश ऊर्फ अतुल गौतम साळवे याला वर्सोवा पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध अपहरणासह लैंगिक अत्याचार आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, याच गुन्ह्यांत त्याला दिंडोशीतील विशेष सेशन कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांनी दुजोरा दिला आहे. तक्रारदाराची पीडित सोळा वर्षांची मुलगी आहे. मंगळवारी, १६ जानेवारीला सायंकाळी सात वाजता ती कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली होती. उशिरापर्यंत ती घरी आली नाही म्हणून तिच्या पालकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला; मात्र ती कुठेच सापडली नाही. त्यामुळे तिच्या आईने तिची मिसिंग तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अपहरणाचा गुन्हा नोंदवून वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांनी गुन्हे शाखेला तिचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. तिचा शोध सुरू असताना तिला मालाडच्या मालवणी हरबादेवी मंदिर परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. तिची पोलिसांनी चौकशी केली असता, ती तिचा मित्र अतुल साळवेला भेटण्यासाठी गेली होती. दुसऱ्या दिवशी त्याने तिच्यावर जबदस्तीने लैंगिक अत्याचार केला होता. तिच्या तपासात ही माहिती येताच प्रकाश ऊर्फ अतुल साळवे याला काही तासांत गणेश पवार यांच्या पथकाने मालवणी येथून अटक केली. त्याच्याविरुद्ध अपहरणासह लैंगिक अत्याचार आणि पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी

भारतीय संघाची सामन्यावर पकड;जयस्वाल, राहुल यांची नाबाद अर्धशतके; बुमराच्या विकेटचे पंचक