मुंबई

बालन्यायालयात बोगस दस्तावेज सादर करणाऱ्या आरोपीस अटक

शाळेच्या मुख्याधापकाने आरोपी मुलगा त्यांच्या शाळेचा विद्यार्थी नसून त्याने दिलेला शाळा सोडल्याचा दाखला बोगस असल्याचे सांगितले.

नवशक्ती Web Desk

मुंबई : लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या गुन्ह्यांत डोंगरीतील बालसुधारगृहात असलेल्या मुलाचे उत्तर प्रदेशातील शाळेचे बोगस दस्तावेज सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी जुम्मन नावाच्या एका आरोपीला विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर आरोपी मुलाचे बोगस शाळा सोडल्याचा दाखला बनवून बालन्यायालयाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. गेल्या वर्षी विलेपार्ले येथे एका अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत या मुलाला ताब्यात घेतल्यानंतर त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते. यावेळी त्याच्या वकिलांनी बालन्यायालयात आरोपीचा उत्तरप्रदेशातील शाळेचा दाखला सादर केला होता. त्यात त्याची जन्मतारीख १ जानेवारी २००६ अशी होती. या दाखल्याची पडताळणी करण्याचे आदेश बालन्यायालयाने विलेपार्ले पोलिसांना दिले होते. त्यानंतर पोलीस शिपाई राहुल पाटील हे उत्तरप्रदेशातील संबंधित शाळेत गेले होते. यावेळी शाळेच्या मुख्याधापकाने आरोपी मुलगा त्यांच्या शाळेचा विद्यार्थी नसून त्याने दिलेला शाळा सोडल्याचा दाखला बोगस असल्याचे सांगितले.

मराठवाड्यात कोसळधार! ढगफुटी सदृश्य पावसाने गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

Thane First Metro : ठाणे मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी यशस्वी; कशी आहे ठाणेकरांची पहिली मेट्रो, जाणून घ्या

कारचालकाने अचानक ब्रेक दाबला अन्...; मुलुंड टोलनाक्याजवळ अपघात, ८ ते ९ वाहने एकमेकांना आदळली

पाक लष्कराचा स्वतःच्याच नागरिकांवर हवाई हल्ला; खैबर पख्तूनख्वात ३० जणांचा बळी

आता नोकरी मिळवणे होणार सोपे! केंद्र सरकार तयार करतेय ‘डॅशबोर्ड’