मुंबई

अभिनेता सुशांत शेलारच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली

प्रतिनिधी

अभिनेता सुशांत शेलारच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याची आणि गाडीची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून याप्रकरणी सुशांत शेलार याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

सुशांत शेलार यांच्या राहत्या घराच्याबाहेर ही घटना घडली आहे. रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने येऊन कारवर दगड मारला. यात कारची समोरील काच पूर्णपणे फुटली आहे. तसेच या इसमाने कारच्या समोर येऊन बेरिकेट्सही लावले. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, सुशांत शेलार याला याबद्दल विचारले असता त्याने हा भ्याड हल्ला असल्याचे सांगितले.

सत्ताधारी महायुतीत बंडखोरीची चिन्हे; विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून तीन उमेदवार जाहीर

सोयाबीनच्या उत्पादनात ७० ते ८० टक्क्यांची घट; शेतकरी, व्यापारी आणि प्रक्रिया उद्योग आर्थिक संकटात

डिसेंबरपर्यंत उन्हाचे चटके बसणार! एल निनोची तीव्रता वाढणार, सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार

ज्ञानेश कुमार यांच्यावरील याचिकांवर आज सुनावणी

Mumbai : गेमचा आयडी वापरला म्हणून चाकूहल्ला; तरुण गंभीर जखमी