मुंबई

मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो, तुम्हीही राजीनामा द्या आणि... - आदित्य ठाकरे

प्रतिनिधी

राज्यातील सत्ता बदलानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यामध्ये रोज नव्याने काहीनाकाही आरोप-प्रत्यारोप समोर येतच आहेत. अनेकदा एकमेकांना खुले आव्हान देखील दिले जात आहे. अशात आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या आव्हानाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो, तुम्हीही राजीनामा द्या आणि माझ्या विरोधात वरळीतून निवडणूक लढवा, असे खुले आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारंवार निवडणुका घेण्याचे आव्हान दिले आहे. मुंबईतील चेंबूर येथील कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा आव्हान दिले आहे. वरळीत माझ्यासमोर उभे राहून निवडणूक लढवा, असे थेट आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिले आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, "महाराष्ट्रातील 13 खासदार आणि 40 आमदारांनी विश्वासघात केला आहे. मी त्यांना आज आव्हान देत आहे. खासदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून कसे येत हे मला बघायचे आहे. मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनाही आव्हान देतो की, मी वरळीचा राजीनामा देतो... वरळीतून तुम्ही माझ्यासमोर उभे राहा.

"जाहीर माफी मागा, अन्यथा..."; पॉर्न स्टार म्हटल्यामुळे दुखावलेल्या 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना इशारा

सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर झाले क्रॅश, Video सोशल मीडियावर व्हायरल

धक्कादायक! पत्नीनं दिलं गुंगीचं औषध, पतीनं केला बलात्कार...; मुंबईत नेमकं काय घडलं?

'वडा पाव गर्ल'ला दिल्ली पोलिसांनी केली अटक? रस्त्यावरील हाय-व्होल्टेज ड्रामाचा Video Viral!

गाडी आहे की टँक! 2024 Force Gurkha भारतात लॉन्च, Mahindra Tharला देणार टक्कर