प्रसिद्ध ॲड गुरू पियुष पांडे यांचे निधन 
मुंबई

प्रसिद्ध ॲड गुरू पियुष पांडे यांचे निधन

‘अब की बार, मोदी सरकार’ हे घोषवाक्य लिहिणारे आणि ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ हे भारतीय एकात्मतेपर गीत लिहिणारे जाहिरात क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असलेले पियुष पांडे यांचे गुरुवारी निधन झाले. ते ७० वर्षांचे होते.

Swapnil S

मुंबई : ‘अब की बार, मोदी सरकार’ हे घोषवाक्य लिहिणारे आणि ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ हे भारतीय एकात्मतेपर गीत लिहिणारे जाहिरात क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असलेले पियुष पांडे यांचे गुरुवारी निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. भारतातील जाहिरातींना नवा आयाम प्रदान करण्यात पांडे यांचे महत्त्वाचे योगदान होते. ओगिल्वी इंडियामध्ये त्यांनी ४० वर्षांहून अधिक काळ काम केले.

कुछ खास है

तरूणपणी सुरुवातीला क्रिकेटपटू, टी टेस्टर आणि बांधकाम मजूर म्हणून काही काळ काम केल्यानंतर पांडे यांनी १९८२ साली ‘ओगिल्वी’ कंपनीत प्रवेश केला. २७ व्या वर्षी जाहिरात क्षेत्रात पदार्पण करत इंग्रजीचा दबदबा असलेल्या या क्षेत्रात पांडे यांनी आपल्या लेखणीने स्वतःचे वर्चस्व निर्माण केले. त्यांनी जाहिरातींना दिलेले शब्द भारतीय लोकांना कायमचे लक्षात राहिले. एशियन पेंट्ससाठी ‘हर खुशी मे रंग लाए’, कॅडबरीसाठी ‘कुछ खास है’, ठंडा मतलब कोका-कोला, फेविकॉल आणि हचसाठी पग श्वानाचे कॅम्पेन अशा कितीतरी उत्पादनांना कायम लक्षात राहतील, अशा जाहिराती पांडे यांनी दिल्या.

पांडे यांचा जन्म १९५५ साली जयपूरमध्ये झाला होता. पियुष पांडे यांचे बंधू प्रसून पांडे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. तर बहीण इला अरुण गायिका आणि अभिनेत्री आहे. पियुष पांडे यांनी ‘पँडेमोनियम’ हे पुस्तक लिहिले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत पांडे यांना आदरांजली वाहिली. पियुष पांडे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दुःख झाले. भारतीय जाहिरात विश्वातील ते एक महान व्यक्ती होते. दररोजच्या जीवनातील संवाद, इथल्या मातीतील विनोदाचे त्यांनी जाहिरातीमध्ये रुपांतर केले. विविध प्रसंगी त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यांचे काम पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे सीतारामन म्हणाल्या.

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग