मुंबई

बाप्पाचे आगमन होताच साथीच्या आजारांच्या रुग्णसंख्येत घट

प्रतिनिधी

स्वाईन फ्लू, मलेरिया, डेंग्यू, लेप्टो या साथीच्या आजारांनी मुंबईकरांसह आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली होती. ऑगस्ट महिन्यात मलेरियाचे ७३६, स्वाईन फ्लूचे १८३, डेंग्यूचे १४७ रुग्ण आढळले; मात्र लाडक्या बाप्पाचे आगमन होताच साथीच्या आजारांच्या रुग्णसंख्येत घट झाल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने मंगळवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे.

१ ते ४ सप्टेंबर दरम्यान मलेरियाचे ८९, डेंग्यूचे २९ तर स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्येत घट झाल्याने मुंबईकरांना बाप्पा पावला आहे.

कोरोनाच्या चौथ्या लाटेचा पुन्हा एकदा फैलाव होत असताना साथीच्या आजारांचा विळखा मुंबईला बसला होता. गेल्या काही महिन्यांपासून डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लूचे रुग्ण सातत्याने वाढत होते.

१ ते २८ ऑगस्टदरम्यान मलेरियाचे ७३६, स्वाईन फ्लूचे १८३, डेंग्यूचे १४७ तर लेप्टोचे ६१ रुग्ण आढळले होते; मात्र ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात रुग्णसंख्येत झपाट्याने घट झाल्याने मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब आहे.

... तर तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल; फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांचा टोला

अमित शहांच्या भाषणाचा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल, FIR दाखल

विनातिकिट प्रवास हा गुन्हाच- हायकोर्ट; उच्चपदस्थ अधिकाऱ्याला तूर्तास दिलासा

माढ्यात फडणवीसांनीही टाकला डाव; अभिजित पाटील, धवलसिंह भाजपच्या गळाला?

दक्षिण भारतात पाण्याची भीषण टंचाई, केवळ १७ टक्के जलसाठा; महाराष्ट्र, गुजरातमध्येही परिस्थिती भीषण