मुंबई

भाजप मुंबई अध्यक्षपदासाठी लवकरच नवीन चेहरा? 'या' नावांची जोरदार चर्चा

मुंबई महापालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने रणनीती आखली असून मुंबई भाजपला अध्यक्षपदाचा नवीन चेहरा देण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने रणनीती आखली असून मुंबई भाजपला अध्यक्षपदाचा नवीन चेहरा देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, अमित साटम यांच्या नावाची चर्चा या पदासाठी आहे. मात्र प्रवीण दरेकर यांच्या नावाला भाजप आमदारांनी पसंती दिल्याचे समजते.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर महायुतीच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी कंबर कसली आहे. मुंबई अध्यक्ष पदासाठी नवीन चेहरा देण्याबाबत भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे भाजपचे विद्यमान मुंबई अध्यक्ष आहेत.

मिशन महापालिका लक्षात घेऊन भाजपने मुंबईचे नेतृत्व नव्या चेहऱ्याकडे देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये, आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, अमित साटम यांची नावे चर्चेत आहेत. मुंबईतील भाजपचे सर्व आमदार, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत प्रवीण दरेकर यांच्या नावाला पसंती दिली असल्याचे समजते. मविआचे सरकार असताना दरेकर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते. तर, महायुतीचं सरकार आल्यावर ते विधान परिषदेत पक्षाचे गटनेते झाले.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली