मुंबई

वायू प्रदूषणाची तक्रार मुंबई एअरवर; मुंबईकरांना मोबाईल ॲपवर सुविधा

मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करत मुंबईतील प्रदूषणाबाबत उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते.

Swapnil S

मुंबई : मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार वायू प्रदूषणाच्या तक्रारींसाठी संकेतस्थळ (वेब पोर्टल) आणि मोबाईल ॲॅप्लिकेशन विकसित केले आहे. अँड्राईडवर ‘मुंबई एअर’ नावाचे एक विशेष ॲॅप्लिकेशन विकसित केले असून नागरिकांना या ॲॅप्लिकेशनचा वापर करून तक्रार दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. प्रत्येक विभागनिहाय तक्रार करण्याची सुविधा ॲॅपमध्ये उपलब्ध असून प्रारंभी अँड्राईड प्लॅटफॉर्मवर हे ॲॅप्लिकेशन वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करत मुंबईतील प्रदूषणाबाबत उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. मुंबईतील वायू प्रदूषणावर नियंत्रणासाठी पालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर सुरू आहे. नागरिकांना आपल्या भागातील वायू प्रदूषणाची तक्रारीसाठी डिजिटल माध्यम उपलब्ध करून देण्यासाठीच्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी पर्यावरण विभागाला दिले होते. पर्यावरण विभागाने नागरिकांच्या सहज वापरासाठीचे असे मोबाईल ॲॅप्लिकेशन तसेच संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे. मोबाईल ॲॅप्लिकेशनच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या भागातील तक्रारींची मांडणी करणे सहज शक्य आहे. महानगरपालिकेच्या विभाग पातळीवर या तक्रारींची दखल घेत तक्रारींचा तत्काळ निपटारा करण्यासाठी डॅशबोर्ड विकसित करण्यात आला असल्याची माहिती उपायुक्त (पर्यावरण) मिनेश पिंपळे यांनी दिली.

ॲॅप्लिकेशनचा असा वापर करा

गेल्या सहा महिन्यांतील तक्रारी पाहता येणार

गुगल प्ले स्टोअरवर मुंबई एअर ॲॅप्लिकेशन डाऊनलोड करा.

ॲॅप इन्स्टॉल करताना सर्व परवानग्यांचा पर्याय क्लिक करा.

मोबाईल नंबर साईन इन करण्यासाठी क्लिक करा.

‘एसएमएस’द्वारे मोबाईलवर आलेला ओटीपी दाखल करा आणि पडताळणी (व्हेरिफिकेशन) प्रक्रिया पूर्ण करा.

युजर प्रोफाईलमध्ये वैयक्तिक माहितीचा भरणा करा.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक