अजितदादांचे मुंबई विमानतळावरील CCTV फुटेज देण्यास नकार; केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाच्या नकारामुळे संशय बळावला 
मुंबई

अजितदादांचे मुंबई विमानतळावरील CCTV फुटेज देण्यास नकार; केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाच्या नकारामुळे संशय बळावला

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त केला जात आहे. रोहित पवार यांनी याप्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी मुंबई विमानतळावरील २८ जानेवारी २०२६ रोजीचे सीसीटीव्ही फुटेज मागितले होते. मात्र केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने ते देण्यास नकार दिला आहे.

Swapnil S

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेकांनी शंका उपस्थित केल्या आहेत. रोहित पवारांनी अनेक वेळा पत्रकार परिषदा घेत विमान अपघातासंबंधी अनेक सवाल उपस्थित केले. अशातच माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी केंद्रीय नागरी सुरक्षा वाहतूक विभागाकडे २८ जानेवारी २०२६ रोजीचे मुंबई विमानतळावरील पहाटे सहा ते सकाळी नऊ दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज देण्यात यावे, अशी मागणी १० फेब्रुवारी रोजी माहिती अधिकारात केली होती. मात्र, हे सीसीटीव्ही फुटेज देण्यास केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने नकार दिला आहे.

नितीन यादव म्हणाले की, "मी आरटीआय अंतर्गत अजित पवारांच्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली होती. याप्रकरणी वारंवार पाठपुरावाही केला होता. पण संबंधित विभागाने मी मागवलेली माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे अजित पवारांचा खरोखरच घात झाला का? असा मोठा प्रश्न पडतो. याप्रकरणी मी आता अपिल केले असून, सुप्रीम कोर्ट व केंद्रीय माहिती आयुक्तांच्या निर्णयाचा दाखला देत पुन्हा एकदा या फुटेजची मागणी केली आहे."

तसेच मुंबई पोलीस आयुक्तांनाही माहिती अधिकाराद्वारे मुंबई येथील 'देवगिरी' या शासकीय निवासस्थानपासून ते मंत्रालयपर्यंतचे मुंबई वाहतुक पोलीस विभागाकडे असणारे दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजीचे पहाटे ६ ते सकाळी ९ दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज मागविले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून संविधानिक पदावर काम करणारे लोकप्रतिनिधी तसेच शासकीय जनसेवक म्हणून कार्यरत असल्याने केंद्रीय विमान वाहतूक विभागाने जे मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज नाकारले आहे, ते धक्कादायक आहे. त्यांनी तत्काळ अजित पवार यांचे त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करावे, अशी नितीन यादव यांची मागणी आहे.

तीन रखडलेले पूल ऑक्टोबर महिन्यात सेवेत; सायन पुलाची डेडलाइन पुन्हा हुकली, विद्याविहार गोरेगाव-चित्रनगरी उड्डाणपूल अंतिम टप्यात

Thane : एसटीचे 'आवडेल तेथे कोठेही प्रवास पास' आता ऑनलाइन; चार आणि सात दिवसांचे पास घरबसल्या काढता येणार

Thane : पूर्णेकर हत्या प्रकरणी सत्ताधारी -विरोधक आमने-सामने; निष्पक्ष तपासाची आरोप-प्रत्यारोपांना धार

Mumbai : ठाकरे बंधूंचा आज गर्जना मोर्चा

Mumbai : वांद्रे-सी लिंक ते गोरेगाव आता सुसाट; ५० मिनिटांचा प्रवास १५ मिनिटांत, उन्नत मार्ग दीड वर्षांत पूर्ण होणार