मुंबई

अमृता फडणवीस - प्रियंका चतुर्वेदी यांच्यात रंगला वाद; फसवणूक प्रकरणावरून केले होते ट्विट

प्रतिनिधी

काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटींची लाच देऊ करणाऱ्या डिझायनर अनिक्षाला अटक करण्यात आली. हे प्रकरण काल चांगलेच गाजले होते. अधिवेशनातही हा मुद्दा उचलून धरण्यात आला. त्यानंतर या प्रकरणावर ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी एक ट्विट केले. यामध्ये त्यांनी या प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी एक बातमी ट्विट करत लिहिले होते की, "गुन्हेगाराच्या मुलीला उपमुख्यमंत्र्यांच्या घरात प्रवेश मिळतो आणि ती त्यांच्या पत्नीशी ५ वर्षांहून अधिक काळ मैत्री करते. ती उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नींना दागिने, प्रमोशनसाठी कपडे पुरवते. तसेच ती त्यांच्यासोबत गाडीमध्येदेखील फिरते. हे महाराष्ट्रात नक्की काय चालले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी?" त्यांनी केलेल्या या ट्विटरवर अमृता फडणवीस यांनी उत्तर दिले.

अमृता फडणवीस या ट्विटला उत्तर देताना म्हणाल्या की, "मॅडम चतुर, यापूर्वी तुम्ही खोटा दावा केला होता की, मी अ‍ॅक्सिस बँकला फायदा करून दिला. आता तुम्ही माझ्या प्रामाणिकपणाला आव्हान देत आहात? निश्चितच, तुमचा विश्वास जिंकून जर कोणी तुमच्याशी संपर्क साधला असता आणि प्रकाराने दाबण्याकरिता पैसे दिले असते, तर तुम्ही तुमच्या बॉसद्वारे त्याला मदत केली असती. तीच तुमची लायकी आहे." यानंतर प्रियंका चतुर्वेदींनीही त्यांना ट्विटद्वारे उत्तर दिले.

त्या म्हणल्या, "नशीब, प्रमोशनसाठी डिझायनर कपडे विकत घेण्याची माझी लायकी नाही आहे. यामुळे नंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण होते, 'मिस फॅड-नॉइज'. मला कळत नाही की स्वतंत्र तपासाच्या मागणीने तुमचा इतका गोंधळ का झाला? प्रामाणिकपणे ज्या दिवशी तिने तुम्हाला पैसे कमावण्याच्या टिप्स दिल्या, त्याच दिवशी तुम्ही तिच्याविरोधात तक्रार करायला हवी होती." असे खासदार चतुर्वेदी म्हणाल्या.

भर सभेत रडले रोहित पवार...सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेत नेमकं काय घडलं?

घसा बसलेला असतानाही शरद पवारांनी केलं भाषण, सुप्रिया सुळेंची सांगता सभा गाजवली

भारतीय महिला ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानसह एकाच गटात; महिलांच्या टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जमावानं जीव जाईपर्यंत मारलं, नेमका कुठं घडला प्रकार?

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम