मुंबई

अकरा लाखांच्या अपहारप्रकरणी वयोवृद्धाला अटक

गोरेगाव येथील एम. जी रोड, इंद्रयुद्ध सहकारी सोसायटीमध्ये राहत होते. त्याला त्याच्या फ्लॅटची विक्री करायची होती.

नवशक्ती Web Desk

मुंबई : अकरा लाखांच्या अपहारप्रकरणी श्रीकांत किशोर सावंत या ६५ वर्षांच्या वयोवृद्धाला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. फ्लॅटचा टोकन रक्कमेचा अपहार करून फसवणूक केल्याचा श्रीकांत सावंतवर आरोप आहे. पीओपी कॉन्ट्रक्टर असलेले वयोवृद्ध तक्रारदार गोरेगाव परिसरात राहतात. त्यांच्या मुलासाठी त्यांनी श्रीकांत सावंतचा फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीकांत हा गोरेगाव येथील एम. जी रोड, इंद्रयुद्ध सहकारी सोसायटीमध्ये राहत होते. त्याला त्याच्या फ्लॅटची विक्री करायची होती. त्यामुळे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत ते त्यांच्या दोन्ही मुलांसोबत फ्लॅट पाहण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यात फ्लॅट खरेदी-विक्रीचा ५५ लाखांमध्ये सौदा झाला होता.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली