मुंबई

Mumbai : दुसरी ‘लाइफलाईन’ पादचाऱ्यांसाठी काळ; ‘बेस्ट’च्या धडकेत दोन वर्षांत ६२ जणांचा मृत्यू, २४७ अपघातांत १४३ जण जखमी

Kurla best bus Accident: सर्वांत स्वस्त व सुरक्षित प्रवास म्हणून प्रवासी बेस्ट बसला पसंती देतात. मात्र गेल्या काही वर्षांत बेस्ट बसच्या अपघातात वाढ झाली आहे. उपनगरीय रेल्वेनंतर मुंबईकरांची दुसरी लाइफलाईन म्हणून बेस्टची ओळख आहे.

गिरीश चित्रे

सर्वांत स्वस्त व सुरक्षित प्रवास म्हणून प्रवासी बेस्ट बसला पसंती देतात. मात्र गेल्या काही वर्षांत बेस्ट बसच्या अपघातात वाढ झाली आहे. उपनगरीय रेल्वेनंतर मुंबईकरांची दुसरी लाइफलाईन म्हणून बेस्टची ओळख आहे. गेल्या दोन वर्षांत बेस्ट बसच्या अपघातात ६२ जणांचा मृत्यू झाला आहे.

२०२२-२३ पासून आतापर्यंत बेस्टचे २४७ अपघात झाले असून यामध्ये १४३ जण गंभीर जखमी झाले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेला बेस्ट उपक्रमाने प्राधान्य दिले पाहिजे तसेच प्रवाशांनाही रस्त्यावरून ये-जा करताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन प्रवासी संघटनांनी केले आहे.

बेस्टच्या ३ हजार बसमधून दररोज ३५ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या बेस्टने प्रवाशांच्या पर्यावरण संवर्धनासाठी इलेक्ट्रिक एसी बसचा समावेश ताफ्यात करण्यास सुरुवात केली. मात्र भाडेतत्त्वावरील बसच्या अपघातात वाढ झाली असून कधी दुभाजकाला धडक तर कधी आग अशा घटना घडत आहेत.‌ त्यामुळे मुंबईची दुसरी लाइफलाईन पादचारी, प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे.

दादर टीटी खोदादाद सर्कल येथे बेस्ट उपक्रमाच्या तेजस्विनी बसने सिग्नलवर उभ्या असलेल्या डंपरला मागून धडक दिल्याची घटना २ नोव्हेंबर २०२१ रोजी घडली होती. या दुर्घटनेत गंभीर जखमी चालकाच्या मृत्यूसह ३ जणांचा मृत्यू, तर ८ जखमी झाले होते. तर भांडुप येथे ११ ऑगस्ट २०२१ रोजी बेस्ट बस इलेक्ट्रिक कॅबिनवर धडकली होती. या दुर्घटनेत वृद्धाचा मृत्यू, तर दोन जखमी झाले होते.

२२ जून २०२३ रोजी गिरगाव येथे बेस्ट बसला झालेल्या अपघातात वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अशाप्रकारे ठकाविक कालावधीनंतर घडणार्याघ अपघातांना पादचारी, प्रवाशांना जीव गमवावा लागत आहे. गेल्या दोन वर्षांत बेस्ट बसेसच्या १५८ अपघातात ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४१ जण जखमी झाल्याचे बेस्ट उपक्रमाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.

असे घडले बेस्ट बस अपघात

भाडेतत्त्वावरील गाड्यांचे वर्ष २०२२ ते २०२३ आणि २०२३-२४ वर्षापासून आतापर्यंत ११४ अपघात झाले आहेत. यामध्ये ४० जीवघेणे तर ६० गंभीर स्वरूपाचे अपघात झाले आहेत, तर ‘बेस्ट’च्या स्वत:च्या ताफ्यातील गाड्यांचे वर्ष २०२२ ते २०२३ आणि २०२३-२४ वर्षापासून आतापर्यंत १३३ अपघात झाले असून २२ जीवघेणे, तर ८३ गंभीर स्वरूपाचे आहेत.

दाव्यानुसार आर्थिक नुकसानभरपाई

‘बेस्ट’ अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तातडीने बस आगारातून बस निरीक्षक, अपघात निरीक्षक यांना घटनास्थळी त्वरित जखमीची मदत करण्यासाठी पाठवण्यात येते. जखमींची परिस्थिती गंभीर असल्यास जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात येते. मृतांना दाव्यानुसार ‘बेस्ट’कडून आर्थिक नुकसानभरपाई दिली जाते.

प्रशिक्षणाच्या कालावधीत वाढ

बेस्ट’च्या ताफ्यात स्वत:च्या एक हजार तर भाडेतत्त्वावरील २२०० गाड्या आहेत. या बसवर ड्रायव्हिंग करताना १० दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येते. अपघात टाळण्यासाठी हे प्रशिक्षण वाढवण्याची गरज आहे का, याबाबत पुनर्विचार करून आवश्यकता असल्यास प्रशिक्षण काळ वाढवण्यात येणार असल्याचे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी ड्रायव्हरना सौजन्य, मानसिक स्थैर्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी नियोजन करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अपघातानंतर अशी होते कार्यवाही

बेस्टच्या ताफ्यात सध्या एकूण ७,२१२ बसचालक तर ७,४२३ बसवाहक आहेत. तर ६,५६३ कंत्राटी बसचालक तर २,३४० कंत्राटी बसवाहक आहेत. यामध्ये कंत्राटी बसच्या अपघातास कंत्राटदार तर बेस्टच्या स्वमालकीच्या गाडीचा अपघात झाल्यास बेस्ट प्रशासन पादचारी-प्रवाशाच्या मृत्यूला जबाबदार असते.

त्रासलेले कंत्राटी कर्मचारी

बेस्टच्या ताफ्यात अनेक कर्मचारी हे कंत्राटी स्वरूपात सेवेत आहेत. विशेषत: बेस्ट उपक्रमातील परिवहन विभागात येणाऱ्या चालक-वाहकांची अधिकतर संख्या ही कंत्राटी तत्त्वावरच अधिक आहेत. अनेक मुख्य, रहदारीच्या मार्गावरील इलेक्ट्रिक बसमध्ये केवळ चालकच उपलब्ध होत असून प्रसंगी प्रवाशांना बसस्थानकावरच तिकीट काढून प्रवास करावा लागतो.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत