आपटा रेल्वे स्थानक बॉलिवूडचे ‘फेव्हरेट’ डेस्टिनेशन; सीएसएमटीनंतर सर्वाधिक पसंती; मध्य रेल्वेला ८५ लाखांचा महसूल 
मुंबई

आपटा रेल्वे स्थानक बॉलिवूडचे ‘फेव्हरेट’ डेस्टिनेशन; सीएसएमटीनंतर सर्वाधिक पसंती; मध्य रेल्वेला ८५ लाखांचा महसूल

पनवेल-रोहा मार्गावरील आपटा रेल्वे स्थानक आज बॉलिवूडचे ‘फेव्हरेट’ डेस्टिनेशन ठरत असून, ते 'मध्य रेल्वे'साठी मोठ्या उत्पन्नाचे साधन बनले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसनंतर चित्रपट चित्रीकरणासाठी सर्वाधिक पसंतीचे स्थानक म्हणून आपटाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

राजकुमार भगत

उरण : पनवेल-रोहा मार्गावरील आपटा रेल्वे स्थानक आज बॉलिवूडचे ‘फेव्हरेट’ डेस्टिनेशन ठरत असून, ते 'मध्य रेल्वे'साठी मोठ्या उत्पन्नाचे साधन बनले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसनंतर चित्रपट चित्रीकरणासाठी सर्वाधिक पसंतीचे स्थानक म्हणून आपटाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. गेल्या तीन वर्षांत ‘मध्य रेल्वे’ ला चित्रपट चित्रीकरणातून एकूण २.२९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला असून, त्यापैकी एकट्या आपटा स्थानकाचे योगदान ८५.५५ लाख रुपये आहे. हे एकूण महसुलाच्या ३७ टक्क्यांहून अधिक असून, आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ९४.४५ लाख, २०२४-२५ मध्ये ४०.१३ लाख आणि २०२५-२६ मध्ये ९४.६२ लाख रुपयांची कमाई झाली आहे.

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे स्टेशन हिरवाई, डोंगररांगा आणि पावसाळ्यातील धबधब्यांनी वेढलेले आहे.

मुंबईपासून अवघ्या ९० किमी आणि पनवेलपासून १८ किमी अंतरावर असलेल्या या स्थानकाची जुन्या धाटणीची वास्तू आणि ग्रामीण वातावरण निर्मात्यांसाठी आदर्श मानले जाते. विशेष म्हणजे, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या अजरामर चित्रपटातील शाहरुख खान आणि काजोल यांच्यातील रेल्वेचा प्रसिद्ध शेवटचा सीन याच स्थानकावर चित्रित झाला होता. याशिवाय ‘रंग दे बसंती’, ‘खाकी’, ‘बंटी और बबली’, ‘पीके’ आणि ‘बागी’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांचे चित्रीकरणही येथे झाले आहे.

मध्य रेल्वेची ‘एक-खिडकी’ योजना

नुकतेच ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या ‘फ्लिकर’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आपटा स्टेशनला भेट दिली. यावेळी त्यांनी ३२ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला. चित्रपट निर्मात्यांसाठी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी 'मध्य रेल्वे'ने ‘एक-खिडकी’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत परवानगी प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून, आपटासह पनवेल, चौक, नेरळ, माथेरान, लोणावळा आणि सातारा यांसारख्या ठिकाणी चित्रीकरणासाठी संधी उपलब्ध करून दिली जात आहे.

भाडेकरुने घरमालकाची शांतता भंग करणे हा ‘उपद्रव’; HC चे महत्त्वपूर्ण निरीक्षण, पुण्याच्या बुधवार पेठेत लॉज चालवणाऱ्याला दणका

मुलाच्या आयुष्यात आई-वडील दोघेही महत्त्वाचे; उच्च न्यायालयाचा निर्वाळा; याचिकाकर्त्या महिलेला झटका

सोन्या-चांदीवरील आयात शुल्क दुप्पट; रुपया सावरण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नीट पेपरफुटीः पुण्यातून महिलेसह पाच ताब्यात; कोचिंग क्लासेस, डॉक्टर्स यांचाही सहभाग?

आता ‘वर्षा’वरही CCTV यंत्रणा; राज्यातील पहिलेच शासकीय निवासस्थान