मुंबई

आश्रमशाळेत नववीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

तलासरी तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या गिरगाव शासकीय आश्रमशाळेतील नववी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पल्लवी शरद खोटरे (१४) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

Swapnil S

पालघर : तलासरी तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या गिरगाव शासकीय आश्रमशाळेतील नववी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पल्लवी शरद खोटरे (१४) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

पल्लवी खोटरे ही विद्यार्थिनी शुक्रवारीच आपल्या घरी सुट्टीवरून शाळेत परतली होती. सकाळी सुमारास तिचे नातेवाईक तिला वसतीगृहात सोडून गेले होते. दुपारी, तब्येत बरी नसल्याचे कारण देत तिच्या वर्गातील दोन विद्यार्थिनींनी तिला वसतीगृहात विश्रांतीसाठी नेले. काही वेळातच तिने वसतीगृहाच्या पहिल्या मजल्यावरील लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.

पल्लवीच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, वाढता मानसिक तणाव, कौटुंबिक पार्श्वभूमीतील अडचणी, शैक्षणिक दडपण आणि भावनिक अस्थैर्य यांसारख्या कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची गंभीर बाब अधोरेखित झाली आहे.

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’