मुंबई

आशियातील पहिल्या महिला लोकोपायलट सुरेखा यादव निवृत्त होणार

आशियातील पहिल्या महिला लोकोपायलट म्हणून इतिहास रचणाऱ्या सुरेखा यादव या या महिन्याच्या अखेरीस ३६ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली.

Swapnil S

मुंबई : आशियातील पहिल्या महिला लोकोपायलट म्हणून इतिहास रचणाऱ्या सुरेखा यादव या या महिन्याच्या अखेरीस ३६ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली.

यादव यांनी १९८९ मध्ये भारतीय रेल्वेत प्रवेश केला. पुढच्याच वर्षी त्या सहाय्यक चालक बनल्या आणि आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालकाचा मान मिळवला. सातारा जिल्ह्यात जन्मलेल्या यादव यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा पूर्ण करून रेल्वेत प्रवेश केला आणि पुरुषप्रधान क्षेत्रात पायऱ्या चढत पुढे गेल्या.

१९९६ मध्ये त्यांनी मालगाडी चालवली. २००० पर्यंत त्या मोटरवुमन बनल्या. दहा वर्षांनी त्यांनी घाट विभागात गाड्या चालवण्याची पात्रता मिळवली आणि नंतर मेल व एक्स्प्रेस गाड्यांची जबाबदारी सांभाळली.

FDA ची राज्यव्यापी कारवाई; १.९० कोटींचा साठा जप्त; मुंबईतील ६ पानटपऱ्यांवर कारवाई

Mumbai : सीएसएमटी रेल्वे स्थानकाला बॉम्बची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क, पोलिसांकडून धमकी देणाऱ्याचा शोध सुरू

Mumbai : छठपूजेनिमित्त बेस्टची विशेष बससेवा; जुहू बीचवर जाण्यासाठी २२ अतिरिक्त बस, जाणून घ्या मार्ग अन् वेळ

सोनाक्षी सिन्हाच्या मॉर्फ फोटोंप्रकरणी दिल्लीतील तरुणाला अटक; पण कोर्टाकडून आरोपीची सुटका, नेमकं कारण काय?

IndiGo Emergency Landing : गुवाहाटीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड; पुण्यात आपत्कालीन लँडिंग, १९२ जण सुखरूप