संग्रहित छायाचित्र
मुंबई

बोरा बाजार नव्हे, शांतीनाथ देरासर मार्ग, नामकरणाची विधानसभा अध्यक्षांची शिफारस 

मुंबईतील फोर्ट येथील बोरा बाजार परिसरात श्री शांतीनाथ श्वेतांबर जैन देरासर मंदिर असून श्वेतांबर जैन भाविकांसाठी पवित्र स्थळ आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील फोर्ट येथील बोरा बाजार परिसरात श्री शांतीनाथ श्वेतांबर जैन देरासर मंदिर असून श्वेतांबर जैन भाविकांसाठी पवित्र स्थळ आहे. त्यामुळे या परिसराचे नामकरण करण्यात यावे अशी मागणी स्थानिक रहिवाशांची आहे. त्यामुळे बोरा बाजार परिसराजवळील मार्गाचे नामकरण ‘शांतीनाथ देरासर मार्ग’ असे करण्यात यावे, अशी शिफारस विधानसभा अध्यक्ष आणि कुलाबा विधानसभा क्षेत्राचे आमदार ॲड. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. 

बोरा बाजार, फोर्ट येथे प्राचीन असे श्री शांतीनाथ श्वेतांबर जैन देरासर मंदिर आहे. श्वेतांबर जैन भाविकांच्या दृष्टीने हे अत्यंत पवित्र असे धार्मिक स्थळ असून येथे वर्षभर श्रद्धाळू आणि भाविक मोठ्या संख्येने भेट देत असतात. फोर्ट विभागातील रहिवाशांची या विभागातील रस्त्याचे नामकरण ‘शांतीनाथ देरासर मार्ग’ असे करण्यात यावे, अशी मागणी आहे.

मुंबई, पुण्यासाठी खूशखबर! बदलापूर ते कर्जत तिसऱ्या, चौथ्या मार्गिकेला मंजुरी; पुणे मेट्रोच्या 'फेज २'चा विस्तार होणार

उठ भक्ता झोपलास काय, १ तारखेला लक्ष्मी येणार! मंत्री गुलाबराव पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य; एकनाथ शिंदे यांची सारवासारव

‘बॉम्बे’चे मुंबई करण्यात भाजपचा मोठा वाटा! मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज ठाकरेंवर पलटवार

श्रीराम मंदिराच्या ध्वजारोहणाला पाकचा विरोध; संयुक्त राष्ट्रांना केले आवाहन

NRC हाच SIR मागील खरा हेतू; ममता बॅनर्जींची जोरदार टीका