मुंबई

निनावी कॉलद्वारे अयोध्येतील राम मंदिरात हल्ल्याची धमकी, उत्तर प्रदेश पोलिसांना सतर्कतेचा इशारा

Swapnil S

मुंबई : निनावी कॉलद्वारे अयोध्येतील राम मंदिरात हल्ला होणार असल्याची धमकी मुंबई पोलिसांना प्राप्त झाली आहे. या कॉलनंतर मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. एका अज्ञात व्यक्तीने शनिवारी रात्री मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला ही माहिती दिल्यानंतर कॉल करणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. त्याच्या चौकशीनंतर या धमकीमागील कारणाचा खुलासा होणार आहे. शनिवारी रात्री सोहम पांडे नावाच्या एका व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला कॉल करून अयोध्येतील राम मंदिरात हल्ला असल्याची माहिती दिली होती. सोहेल कुरेशी नावाचा एक व्यक्ती राम मंदिरात हल्ला करणार असून, तो आग्रा येथील अदपुतकरचा रहिवाशी आहे. आग्रा-मुंबई प्रवासादरम्यान सोहेल ही माहिती सांगत होता, त्यांच्यातील संभाषण ऐकल्यानंतर त्याने ही माहिती मुख्य नियंत्रण कक्षाला दिली होती. ही माहिती त्याने एका आरपीएफ कर्मचाऱ्याला दिल्याचे सांगून त्यांच्यासह सोहमचा मोबाईल क्रमांक दिला आहे. या मोबाईल क्रमांकावरून संबंधित व्यक्तीची पोलिसांनी शोध सुरू केला आहे. दरम्यान, या धमकीनंतर उत्तर प्रदेश पोलिसांना सतर्कचा इशारा देण्यात आला असून, शहरातील सर्व धार्मिक स्थळांवरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस