मुंबई

आयुष व निमवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; १ सप्टेंबरपासून होणार नोंदणी प्रक्रियेला सुरूवात

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) आयुष अभ्यासक्रमाच्या तसेच फिजिओथेरपी आणि नॅचरोपॅथी ॲण्ड योगिक सायन्स (बीएनवायएस) या निमवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

Swapnil S

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) आयुष अभ्यासक्रमाच्या तसेच फिजिओथेरपी आणि नॅचरोपॅथी ॲण्ड योगिक सायन्स (बीएनवायएस) या निमवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार १ सप्टेंबरपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या वैद्यकीय समुपदेशन समितीने (एमसीसी) वैद्यकीय अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यानंतर सीईटी कक्षाने वैद्यकीय, दंत, आयुष व निमवैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी २३ ते ३० जुलैदरम्यान नोंदणी प्रक्रिया राबविली. मात्र एमसीसीकडून फक्त वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

त्यानुसार वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाची पहिली फेरी पार पडल्यानंतर आता एमसीसीकडून आयुष अभ्यासक्रमांतर्गत असलेल्या बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, तर निमवैद्यकीय अभ्यासक्रम असलेल्या बीएनवायएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी व या 'बीपी ॲण्ड ओ' अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी अखेर आझाद मैदानात; बेमुदत आंदोलनावर ठाम, पावसातही आंदोलकांचा उत्साह कायम

लातूर-नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; बचावासाठी लष्कराची मदत, जनजीवन विस्कळीत

...तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप; २९,९६५ गणेशमूर्तीच विसर्जन

...तर भारताचा 'टॅरिफ' कमी करू! व्हाइट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांचे वक्तव्य