मुंबई

Baba Siddique Murder : आरोपी झीशान अख्तर देश सोडून पळाला? Video व्हायरल करत म्हणाला - 'पाकिस्तानी डॉनने केली मदत'

"शहजाद भट्टी माझ्यासाठी मोठ्या भावासारखा आहे; तो आमचे संरक्षण करतो. त्याने मला भारतापासून दूर, आशिया खंडाच्या बाहेर आश्रय मिळवून दिला"

Krantee V. Kale

NCP नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक झीशान अख्तर याने भारत सोडून पळून गेल्याचा दावा केलाय. पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टीने पळून जाण्यात मदत केल्याचा दावा स्वतः अख्तरने केला असून त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

शहजाद भट्टी माझ्यासाठी मोठ्या भावासारखा

"माझ्यावर बाबा सिद्दीकी प्रकरणात खोटा आरोप ठेवण्यात आला आणि शहजाद भट्टीने मला भारतातून पळून जाण्यास मदत केली", असे झीशान व्हिडिओत सांगतो. शहजाद भट्टी मोठ्या भावासारखा असल्याचेही तो म्हणाला. "शहजाद भट्टी माझ्यासाठी मोठ्या भावासारखा आहे; तो आमचे संरक्षण करतो. त्याने मला भारतापासून दूर, आशिया खंडाच्या बाहेर आश्रय मिळवून दिला" असे म्हणत अख्तरने त्याच्या कथित शत्रूंना थेट धमकी दिली आहे.

शहजाद भट्टीचीही कबुली

व्हिडिओ समोर आल्यानंतर, शहजाद भट्टीने स्वतः झीशानच्या पळून जाण्यात आपली भूमिका असल्याचे कबूल केले आणि इन्स्टावर झिशानचा व्हिडिओ टाकून त्याला "भाऊ" म्हणून संबोधले. दरम्यान, व्हायरल व्हिडीओतील व्यक्ती हा फरार आरोपी झीशान अख्तरच आहे का, याची तपासणी मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे. व्हिडिओचा अभ्यास करुन मुंबई पोलिसांची सायबर टीम झीशान अख्तरचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न करत आहे. भट्टीकडून मदत मिळाल्याच्या दाव्याचाही पोलिस तपास करत असल्याची सुत्रांची माहिती आहे.

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गेल्या वर्षी १२ ऑक्टोबर रोजी रात्री ९.१५ च्या सुमारास त्यांचे पुत्र आणि तत्कालीन आमदार झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे येथील कार्यालयाबाहेरच गोळीबार करुन हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणी लाँरेन्स बिष्णोई गँगमधील मारेकऱ्यांना अटक करण्यात आली असून काही आरोपी फरार आहेत.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल