बाबा सिद्दीकी  संग्रहित छायाचित्र
मुंबई

बाबा सिद्दीकी हत्येतील पाच आरोपींना पोलीस कोठडी

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील मुख्य शूटरसह इतर चौघांनाही सोमवारी दुपारी किल्ला न्यायालयाने १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Swapnil S

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील मुख्य शूटरसह इतर चौघांनाही सोमवारी दुपारी किल्ला न्यायालयाने १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. शिवकुमार गौतम ऊर्फ शिवा बालकिशन गौतम, अनुराग राधेश्याम कश्यप, ज्ञानप्रकाश प्रदीपकुमार त्रिपाठी, आकाश बृजकुमार श्रीवास्तव आणि अखिलेंद्र प्रतापसिंह सुरेशसिंह अशी या पाच जणांची नावे आहेत. उत्तर प्रदेशातून विमानातून मुंबईत आणल्यानंतर मेडिकल करुन त्यांना थेट किल्ला न्यायालयात पोलीस बंदोबस्तात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी तिन्ही शूटरने बाबा सिद्दीकी यांच्या घरासह कार्यालयाची जवळपास एक महिना रेकी केली होती. शिवकुमार हा तिसरा शूटर असल्याने त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. गेल्या महिन्यांत बाबा सिद्दीकी यांची वांद्रे येथे तीन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येनंतर पळून जाणार्‍या तीनपैकी दोन शूटरसह १८ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.

Maratha Reservation : मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी अखेर आझाद मैदानात; बेमुदत आंदोलनावर ठाम, पावसातही आंदोलकांचा उत्साह कायम

लातूर-नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; बचावासाठी लष्कराची मदत, जनजीवन विस्कळीत

...तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप; २९,९६५ गणेशमूर्तीच विसर्जन

...तर भारताचा 'टॅरिफ' कमी करू! व्हाइट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांचे वक्तव्य