मुंबईतील बाबुलनाथ मंदिराला नाममात्र दरात जागा; अवघ्या १ रुपयांत ३० वर्षांचे भाडेपट्टा नूतनीकरण छायाचित्र- पिंटरेस्ट
मुंबई

मुंबईतील बाबुलनाथ मंदिराला नाममात्र दरात जागा; अवघ्या १ रुपयांत ३० वर्षांचे भाडेपट्टा नूतनीकरण

मुंबईतील गिरगाव जवळील प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या जागेचा (भाडेपट्टा) प्रश्न सरकारने निकाली काढला आहे. या जागेचा भाडेपट्टा आता 'बाबुलनाथ चॅरिटी ट्रस्ट'ला अवघ्या १ रुपया या नाममात्र दराने ३० वर्षांसाठी नूतनीकरण करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Swapnil S

नागपूर : मुंबईतील गिरगाव जवळील प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या जागेचा (भाडेपट्टा) प्रश्न सरकारने निकाली काढला आहे. या जागेचा भाडेपट्टा आता 'बाबुलनाथ चॅरिटी ट्रस्ट'ला अवघ्या १ रुपया या नाममात्र दराने ३० वर्षांसाठी नूतनीकरण करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदनाद्वारे ही माहिती दिली.

मलबार-कंबाला हिल महसूल विभागातील 'भुकर क्रमांक ४३५ पार्ट' या मिळकतीचा हा विषय होता. या निर्णयानुसार, एकूण ७१८.२३ चौ.मी. क्षेत्रफळापैकी १३५ चौ.मी. क्षेत्राचा वापर हा 'वाणिज्यिक' कारणांसाठी होत असल्याने ते क्षेत्र वगळण्यात आले आहे. उर्वरित ५८३.२३ चौ.मी. जागेचा वापर हा केवळ बाबुलनाथ मंदिराकडे जाणाऱ्या मार्गिकेसाठी (पायऱ्या व रस्ता) होत असल्याने या जागेचा भाडेपट्टा नूतनीकरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

बाबुलनाथ मंदिर हे मुंबईतील अतिशय प्राचीन आणि जागृत शिवमंदिर आहे. श्रावण महिना आणि महाशिवरात्रीला येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या आणि मार्गिकेची जागा ही शासकीय जमिनीवर (लीझवर) होती. या लीझचे नूतनीकरण वेळेवर न झाल्याने काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. तसेच, मलबार हिलसारख्या उच्चभ्रू आणि महागड्या परिसरात ही जागा असल्याने, त्याचा बाजारभावानुसार कर भरणे चॅरिटी ट्रस्टला अवघड होऊ शकले असते. या जागेच्या भाडेपट्ट्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. शासनाने आता यावर कायमस्वरूपी तोडगा काढला आहे.

Video : नेपाळमध्ये महाप्रलय! भोटे कोशी नदीला अचानक महापूर; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती, किमान १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता

शासकीय, खासगी, धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिट; तातडीने कार्यवाही करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे निर्देश, राज्य सरकार ॲक्शन मोडवर

Pune : भटक्या कुत्र्याचा महिलेवर हल्ला; तोल जाताच बाळ पडलं खाली, Video व्हायरल

Mumbai : निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता; राजावाडी रुग्णालयातील अन्य डॉक्टरांवर ताण, दिवसाला ५०० रुग्णांची तपासणी

Madhya Pradesh : भाजप आमदाराने अग्निशमन दलाच्या वाहनाने धुतली स्वतःची कार; VIDEO व्हायरल